आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Debit credit Card Is More Secure From Tomorrow, 24x7 Can Also Avail Services Off, Can Also Change Or Change The Transaction Limit.

डेबिट-क्रेडिट कार्ड उद्यापासून जास्त सुरक्षित, २४ तास बंद-सुरू करण्याची सुविधा, व्यवहार मर्यादा कधीही ठरवू शकता!

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • डिजिटल व्यवहारातील फसवणूक रोखण्यासाठी लागू होणार नवे नियम
 • कार्डवरून तुम्ही कधी ऑनलाइन व्यवहार केलाच नसल्यास उद्यापासून सेवा होणार बंद

मुंबई  - डेबिट व क्रेडिट कार्डचा दुरुपयोग रोखण्यासाठी, डिजिटल व्यवहारांतील फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवीन नियम १६ मार्चपासून लागू करण्याचे ठरवले आहे. जानेवारी २०२० मध्ये अधिसूचना जारी केली होती. हे नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड, मेट्रो कार्ड वगळता सर्व डेबिट-क्रेडिट कार्डवर (फिजिकल-व्हर्च्युअल) लागू असतील. रि-इश्यू कार्डचाही समावेश आहे. कार्ड जारी करताना ते केवळ भारतात एटीएम व पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल्सवर व्यवहारासाठी सक्रिय करावे, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले. कार्डवरून तुम्ही कधी ऑनलाइन व्यवहार केलाच नसल्यास उद्यापासून सेवा होणार बंद

 • कोणत्याही डेबिट-क्रेडिट कार्डचा अशा पद्धतीने वापर केला जातो. एटीएमवर, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनलवर, ऑनलाइन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस व्यवहार व आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी वापर.
 • आता डेबिट-क्रेडिट कार्डसोबत केवळ एटीएम, पीओएस टर्मिनलवर वापर करण्याची सुविधा मिळेल. ऑनलाइन, कॉन्टॅक्टलेस, आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी या सेवेला कार्डवर सुरू करावे लागेल.
 • आधी सेवा कार्डसोबत आपोआप उपलब्ध असत. आता मागणी करावी लागेल.
 • ग्राहक चोवीस तासांत कोणत्याही सेवेला मोबाइल, इंटरनेट बँकिग, एटीएम किंवा आयव्हीआरद्वारे सुरू करू शकतात. सोबतच ती बंद किंवा सुरू करण्याचीदेखील सुविधा मिळेल.
 • ग्राहक कार्डद्वारे व्यवहार मर्यादा निश्चित करू शकतील किंवा बदलू शकतील.
 • सध्याच्या कार्डद्वारे आतापर्यंत ऑनलाइन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार केले नसल्यास १६ मार्च पासून ही सेवा बंद होणार आहे.
 • रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना मोबाइल अॅप्लिकेशन, लिमिट मॉडिफाय करण्यासाठी नेटबँकिंगचा पर्याय व एनेबल व डिसेबल सेवा सातही दिवस व चोवीस तास उपलब्ध करण्याची सूचना दिली. बँक शाखा तसेच एटीएमवरही ही सुविधा मिळेल.
 • कार्डच्या स्टेटसमध्येही बदल होणार आहे. बँक एसएमएस/ ई-मेलद्वारे ग्राहकांना अलर्ट/ सूचना/ स्टेटस पाठवतील.
बातम्या आणखी आहेत...