आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हंगेरीत चार किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्म दिल्यावर कर्ज माफ, आईला आयुष्यभर प्राप्तिकर लागणार नाही 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुडापेस्ट- हंगेरी हा युरोपातील देश घटती लोकसंख्या आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येने त्रस्त आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पंतप्रधान ने व्हिक्टर ऑर्बन यांनी नव्या धोरणाअंतर्गत महिलांना अनेक सवलती देण्याची घोषणा केली. व्हिक्टर म्हणाले की, चारपेक्षा जास्त मुले झाल्यावर महिलांना आयुष्यभर प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना पहिल्यांदा लग्न केल्यावर २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळेल. तिसरे मूल होताच तिचे कर्ज माफ होईल. त्याशिवाय जे लोक सातआसनी गाड्या खरेदी करतील त्यांना सरकार मदत करेल. प्रवासी लोकांवरील अवलंबित्व कमी करणे आणि हंगेरीचे भविष्य वाचवण्यासाठी हाच उपाय आहे. उजव्या विचारसरणीचे नेते व्हिक्टर यांच्या पक्षाने गेल्या वर्षी सलग तिसरा निवडणूक विजय मिळवला होता. ऑर्बन गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या विरोधातही बोलत आहेत. 

 

व्हिक्टर म्हणाले की, 'हंगेरियन कुटुंबांनी जास्त मुलांना जन्म देणे हे मुस्लिम देशांच्या प्रवाशांना प्रवेश करण्यास परवानगी देण्यापेक्षा चांगले आहे. लोकसंख्या वाढीसाठी इतरांनी येथे येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आपल्याला संख्या नको, तर हंगेरियन मुले हवीत असे मला वाटते. आमच्यासाठी स्थलांतर हे शरणागतीसारखे आहे. या निर्णयामुळे हंगेरीची लोकसंख्या कमी होण्यावर नियंत्रण मिळेल आणि महिला जास्त मुलांना जन्म घालतील.' ऑर्बन हे राष्ट्राला संबोधित करत होते तेव्हा राजधानी बुडापेस्टमध्ये याविरुद्ध निदर्शने सुरू होती. त्यांच्या कार्यालयासमोर दोन हजार आंदोलन ही धोरणे मागे घेण्याची मागणी करत होते. इतर ठिकाणीही आंदोलन झाले. 

 

हंगेरीची लोकसंख्या ९८ लाख, दरवर्षी ३२ हजार घट 
- हंगेरीची लोकसंख्या ९७.८ लाख आहे. तीत दरवर्षी ३२ हजारांची घट होत आहे. 
- हंगेरीत महिलेमागे मुलांची संख्या १.४५ आहे, ती युरोपियन संघाच्या १.५८ या सरासरीपेक्षा खूप कमी आहे. युरोपियन संघात फ्रान्स याबाबतीत सर्वात पुढे. 
- फ्रान्सच्या महिलांना सरासरी १.९६ मुले आहेत, तर स्पेन या यादीत सर्वात खाली आहे. तेथे सरासरी १.३३ मुले आहेत. 
- जगभरात सर्वाधिक जननदर नायजर या देशाचा आहे. तेथे दर महिलेमागे सरासरी ७.२४ मुले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...