आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Debt Was Less Than Company Wealth, But Siddhartha Was Under Pressure Because Of Personal Debt

कंपनीच्या संपत्तीपेक्षा कर्ज होते कमी, मात्र वैयक्तिक कर्जाने सिद्धार्थवर होता दबाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एनबीएफसी कंपन्यांचा सलग हप्ता थकवल्यामुळे सिद्धार्थ अडकले होते. त्यामुळेच सिद्धार्थ यांना शेअरची विक्री करावी लागली होती. याच विक्रीतून त्यांना ३२६९ कोटी रुपयेदेखील मिळाले, मात्र ही सर्व रक्कम कर्ज फेडण्यात गेली. वृत्तानुसार सिद्धार्थ त्यांची आणखी एक संस्था टँगलिन डेव्हलपर्समधील भागीदारी विक्री करण्याची तयारी करत होते. न्यूयाॅर्कच्या ब्लॅकस्टोन ग्रुपला २,७००-२,८०० कोटी रुपयांत भागीदारी विक्रीची 
त्यांची इच्छा होती. 


सिद्धार्थ वर्ष १९९९ मध्ये माइंड ट्रीचे सहसंस्थापक बनले होते. त्या वेळी आयटीतील दिग्गज अशोक सुता, सुब्रतो बागची, रोस्टो रावानन आणि केके नटराजन आदी सोबत होते. सिद्धार्थ यांनी १९९९ मध्ये माइंडट्रीमधील ६.६ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी ४४ कोटींची गुंतवणूक केली होती. 


वर्ष २०११ मध्ये अनुक्रमे ५.५७ टक्के आणि २.०५ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी १७१ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. मात्र, एलअँडटीसोबत झालेल्या करारात हे संपले. सीसीडीमध्ये तेजीने वाढ झाली, मात्र मागील काही वर्षांत ही कंपनीही कर्जात बुडत गेली. वास्तविक या कंपनीवरील कर्ज कंपनीच्या संपत्तीपेक्षा कमी होते. त्यामुळे हे जास्त संकट नव्हते. अब्जाधीश सिद्धार्थ यांच्यावर वैयक्तिक कर्ज जास्त होते. त्यामुळेच ते दबावात होते, असे बँकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

सिद्धार्थच्या व्यवसायाचा अनेक क्षेत्रांत विस्तार

सिद्धार्थ यांनी ८ वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यवसाय केला. यातील लॉजिस्टिक्स बिझनेस चांगला चालत नव्हता. हे सिद्धार्थवरील दबावाचे मोठे कारण असू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सिद्धार्थ यांच्या कंपन्यांमध्ये कॅफे कॉफी डे, स्नॅक्स आणि बेव्हर्जेस, फ्रेश अँड ग्राउंड काॅफी आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांची साखळी, पाकीटबंद कॉफी पावडर, कॉफी निर्यात, त्यासंबंधी खरेदी आणि विक्री, कॉफी मशीन आणि लॉजिस्टिक्स बिझनेसचा समावेश.

 

कंपनीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकावर 

सिद्धार्थ अचानक गायब झाल्यानंतर सीसीडीच्या गुंतवणूकदारांना कंपनी बंद करण्याची भीती वाटत आहे. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये दुपारी १२.१४ वाजता सीसीडीचे शेअर १९.९९ टक्क्यांच्या घसरणीसह १५४.०५ रुपये प्रति शेअरवर आले. ही ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. त्यानंतर कंपनीचा मार्केट कॅप घसरणीसह ३२५४ कोटी रुपयांवर आला. त्यांनी १९९६ मध्ये ५ लाखांच्या गुंतवणुकीसह कॅफे कॉफी डेची सुरुवात केली होती.

 

 

पत्रात सिद्धार्थने लिहिले की, ३७ वर्षांनंतरही ते एक योग्य आणि फायदा देणारे बिझनेस मॉडेल तयार करू शकले नाही.


दीर्घकाळ लढा दिला. मात्र, आता पराभवाचा स्वीकार करतो
ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांची निराशा करण्यासाठी मी त्यांची माफी मागतो. मी दीर्घ काळापासून लढत असून आत पराभव स्वीकारतो... मी एका खासगी शेअरधारक पार्टनरचा दबाव स्वीकारू शकत नाही... त्यामुळेच परिस्थितीसमोर मान खाली घालण्यासाठी मजबूत झालो आहे. 


प्राप्तिकर विभागाचे माजी डीजी त्रास देत होते
प्राप्तिकर विभागाचे माजी डीपी त्रास देत होते. माजी डीजीने शेअरला दोन वेळा जप्त केले, ज्यामुळे माइंडट्रीसह करार ब्लॉक करता येईल. यामुळे पैशाची कमतरता झाली.


सर्च चुकांसाठी केवळ मी जबाबदार
मी सर्वांना विनंती करतो की, तुम्ही मजबूत राहा आणि एका नवीन व्यवस्थापनासह व्यवसाय सुरू ठेवा. सर्व चुकांसाठी मी स्वत: जबाबदार आहे. कायद्यानेही केवळ मला आणि मलाच जबाबदार धरावे. मी ही माहिती सर्वांपासून लपवली, कुटुंबापासूनही.’


फसवणूक करण्याचा उद्देश नव्हता
माझा उद्देश कोणाचीही फसवणूक करण्याचा नव्हता. मी एक अयशस्वी उद्योजक ठरलो आहे. मला तुम्ही सर्व माफ करताल, अशी मला आशा आहे. मी माझ्या संपत्तीची सर्व माहिती आणि त्यांची अंदाजे किंमत सोबतच्या यादीत जोडली आहे. संपत्तीची किंमत कर्जापेक्षा जास्त आहे. त्यामुळे थकबाकी भरता येईल.

 

सीसीडीवर विविध कर्जदात्यांचे ८,१८३ कोटी रुपयांचे कर्ज थकलेले

आयडीबीआय ट्रस्टीशिपने दिले सर्वाधिक जास्त कर्ज
 

कंपनीचे नाव                     कर्ज 
एके कॅपिटल फायनान्स  - 122
आदित्य बिर्ला फायनान्स -  278
अॅक्सिस बँक लिमिटेड -  315
अॅक्सिस फायनान्स लिमिटेड -  125
अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेज -  915
बजाज फायनान्स लिमिटेड -  45
क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेज  - 150
क्लिक्स फायनान्स इंडिया -  50
एडलवाइज फायनान्स अँड  इन्व्हेस्टमेंट -  25
आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेज -  4,575
आयएफसीआय लिमिटेड -  50
कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट -  125
कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड -  50
पिरामल ट्रस्टीशिप सर्व्हिसेस -  175
राबो इंडिया फायनान्स लिमिटेड -  80
रतन इंडिया फायनान्स लिमिटेड -  50
आरबीएल बँक लिमिटेड -  175
शापूरजी पालूनजी फायनान्स -  80
श्रीराम सिटी युनियन -  50
स्टॅनचार्ट लोन्स अँड इन्व्हेस्टमेंट -  150
एसटीसीआय फायनान्स लिमिटेड -  100
विस्त्रा आयटीसीएल इंडिया - 75
यस बँक लिमिटेड  -  274
एकूण  -  8,183