Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | monthly rashifal, numerology and predictio

मासिक अंक राशिफळ : जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील डिसेंबर 2018

रिलिजन डेस्क | Update - Dec 04, 2018, 12:01 AM IST

2018 मधील शेवटच्या दिवसांमध्ये तुमचा भाग्योदय होणार की नाही? Birth Date वरून समजू शकते, ज्यांची जन्मतारीख 10 किंवा 16 अस

 • monthly rashifal, numerology and predictio

  नवीन महिना डिसेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात म्हणजे 31 डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहील हे बर्थडेटवरून समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील 31 डिसेंबरपर्यंतचा काळ...


  ज्या लोकांची जन्म तारीख 1,10,19 किंवा 28 आहे
  जुन्या योजनांकडे लक्ष द्यावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. खूप कष्ट केल्यानंतर यश प्राप्त होऊ शकते. एखादे नवीन काम मिळू शकते. वैवाहिक जीवनात क्लेश होऊ शकतो. क्रोध करू नये, धैर्य बाळगावे.


  ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
  मानसिक स्वरूपात मजबूत राहावे. कोणत्याही कामामध्ये समजूतदारपणाने यश प्राप्त होऊ शकते. भाग्याची साथ मिळेल. प्रेम-प्रसंगात यश प्राप्त होईल. लग्न जुळण्यात येत असलेल्या बाधा नष्ट होतील. नोकरीत लाभ होईल.


  ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
  जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. संपूर्ण ऊर्जेने काम करू शकाल. नोकरी आणि व्यापारात नवीन संधी मिळू शकतात. धैर्याच्या बळावर शत्रूंवर विजय प्राप्त करू शकाल. घर-कुटुंबात सुख-शांती राहील.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा महिना...

 • monthly rashifal, numerology and predictio

  ज्या लोकांची जन्म तारीख 4,13, 22 किंवा 31 आहे
  दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. एखादी अनामिक भीती राहील. यामुळे कामामध्ये मन लागणार नाही. एखादी चूक होऊ शकते, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांगल्या भविष्यासाठी आतापासून प्लॅनिंग करावी.


  ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14 किंवा 23 आहे
  जे लोक आजारपणामुळे त्रस्त असतील त्यांना आराम मिळेल. औषधींचा प्रभाव सुरु होईल आणि जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. धन संबंधित कामामध्ये सावध राहावे. प्लॅनिंगने काम केल्यास यश प्राप्त होऊ शकते.


  ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15 किंवा 24 आहे
  अनमोल भीती सतावेल. भविष्याची चिंता राहील. लाभाच्या नवीन संधी मिळतील परंतु सावध राहून काम करावे. घर-कुटुंबात एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. धैर्य बाळगावे.

 • monthly rashifal, numerology and predictio

  ज्या लोकांची जन्म तारीख 7, 16 किंवा 25 आहे
  भविष्याच्या काळजीने वर्तमानात चिंतीत राहाल आणि यामुळे काम बिघडू शकते. सावध राहावे. सध्या चालू असलेले काम व्यवस्थित केल्यास भविष्यात लाभ होऊ शकतो. घर-कुटुंबात रोज वाद होऊ शकतो. शांतता बाळगून काम करावे.


  ज्या लोकांची जन्म तारीख 8, 17 किंवा 26 आहे
  नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. प्रवासाला जाण्याचे योग आहेत. हळू-हळू कामामध्ये गती येईल. जुन्या योजना यशस्वी होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील.


  ज्या लोकांची जन्म तारीख 9, 18 किंवा 27 आहे
  तब्येतीमुळे त्रस्त राहाल. महिन्याच्या सुरुवातील हलगर्जीपणा करू नये. काही दिवसानंतर संपूर्ण ऊर्जेने काम करू शकाल. यश प्राप्त होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा.

Trending