आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2018 मधील शेवटचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात चंद्र ग्रहाव्यतिरिक्त इतर 2 ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. इतर ग्रह राशी परिवर्तन करणार नाहीत. ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले असून हे सर्व कुंडलीतील 12 स्थानांमध्ये विचरण करतात. ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ-अशुभ फळ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य मं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, डिसेंबर 2018 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी परिवर्तन करेल 


सूर्य - महिन्याची सुरुवातील हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये आहे. 16 डिसेंबरला धनु राशीमध्ये प्रवेश करेल.


चंद्र - 1 डिसेंबरच्या सकाळी चंद्र सिंह राशीमध्ये राहील. दुपारी हा ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसांनी चंद्र राशी परिवर्तन करेल.


मंगळ - हा ग्रह सध्या कुंभ राशीमध्ये असून 23 डिसेंबरला मीन राशीमध्ये प्रवेश करेल.


बुध - वृश्चिक राशीमध्ये वक्री आणि 7 डिसेंबरला मार्गी होईल.


गुरु - हा ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक राशीमध्ये राहील.


शुक्र - हा ग्रह तूळ राशीमध्ये राहील.


शनि - हा ग्रह धनु राशीमध्ये आहे.


राहु - हा ग्रह संपूर्ण महिना कर्क राशीमध्ये राहील.


केतु - मकर राशीमध्ये राहील.


ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

1. रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

2. शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे.

3. सूर्यास्ताच्या वेळी हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.

4. शनी-, राहू-केतूसाठी शनिवारी तेलाचे दान करावे.

5. घरामध्ये रोज सकाळी-संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा.


काय करू नये 
ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी चुकीच्या कामांपासून लांबच राहावे. कोणाचाही अनादर करू नये. गरिबांना त्रास देऊ नये. कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.

बातम्या आणखी आहेत...