आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळलेल्या हरकतींना न्यायालयात अाव्हानाची शक्यता; 200 उमेदवार रिंगणात कायम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मर्चंट्स काे-अाॅप. बँके (नामकाे) च्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली अाहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत अाता अवघे दाेन दिवस उरली असून, शनिवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात न अाल्याने २०० उमेदवार अाजही रिंगणात अाहेत. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज छाननीमध्ये घेण्यात अालेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्या हाेत्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला व बँकेच्या एनअाेसी प्रक्रियेबद्दल न्यायालयात अाव्हान देण्याची तयारी सुरू झाली अाहे.

 

नामकाे बँकेची निवडणूक २३ डिसेंबरला हाेत असून, चार पॅनल सद्यस्थितीत मैदानात अाहेत. यात प्रगती, सहकार, नम्रता अाणि प्रामाणिक पॅनलचा समावेश असून, प्रामाणिक पॅनलकडून तर अनेकजण इच्छुक असून स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारालाच अाम्ही उमेदवारी देणार असल्याचे नेत्यांनी पत्रक काढून स्पष्ट केले अाहे. दुसरीकडे प्रगती पॅनलकडून ५ डिसेंबरला त्र्यंबकेश्वर येथे प्रचाराचा नारळ वाढविला जाणार अाहे. सहकार पॅनलकडूनही गाठीभेटी, मेळावे सुरू असून ४ डिसेंबरला माघारीच्या मुदतीनंतर पॅनलच्या उमेदवारांची घाेषणा व त्याच बैठकीत प्रचाराचा नारळ वाढविण्याचे नियाेजन जाहीर केले जाणार अाहे.

 

माघारीसाठी दाेन दिवस 

शनिवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी एकही उमेदवाराने अापला अर्ज मागे न घेतल्याने २१ जागांसाठी २०० उमेदवार अाजही रिंगणात कायम अाहेत. यात सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी १६७ उमेदवार तर महिला राखीव गटाच्या २ जागांसाठी २२अाणि अनुसूचित जातीजमाती गटाच्या एका जागेसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात अाहेत. साेमवार अाणि मंगळवार हे दाेन दिवसच माघारीकरिता शिल्लक राहिल्याने वेगाने व नाट्यमय घडामाेडी घडत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...