आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Declaration From India To Establish Kartaharpur Corridor Till The Border, Pakhi Positively

सीमेपर्यंत करतारपूर कॉरिडॉर स्थापण्याची भारताकडून घोषणा, पाकही सकारात्मक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या करतारपूर येथील गुरुनानक देवजींशी संबंधित ऐतिहासिक गुरुद्वारासाठी सीमेपर्यंत भारतात कॉरिडॉर स्थापन केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी या प्रस्तावास मंजुरी दिली. यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, गुरुनानक देव यांनी करतारपूर साहिबमध्ये आपल्या आयुष्यातील १८ वर्षे वास्तव्य केले. हे ठिकाण भारतीय सीमेपासून काही किमी आत पाकिस्तानमध्ये आहे.

 

त्यामुळे आम्ही पाकिस्तान सरकारनेही कॉरिडॉर स्थापन करावा, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत. दुसरीकडे, पाकिस्तान सरकारनेही जारी केलेल्या निवेदनात कॉरिडॉर स्थापण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले. आम्हीही याबाबत लवकरच आनंदवार्ता देऊ,असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याआधीच कॉरिडॉर बनवण्याची घोषणा केली आहे. ते याची पायाभरणी करणार आहेत. मात्र, त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही.  

 

गुरुनानक जयंतीनिमित्त निर्णय  

- डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंतच्या कॉरिडॉरचा खर्च केंद्र सरकार उचलेल.  
- सुलतानपूर लोधी हेरिटेज सिटी केली जाईल, त्याचे नाव पिंड बाबे नानक दा, असे ठेवले जाईल. - गुरुनानक देव विद्यापीठात सेंटर फॉर इंटरफेथ स्टडीज स्थापन होईल. ब्रिटन व कॅनडाच्या दोन विद्यापीठांत या सेंटरच्या नावाचे पीठ. 
- ५५० व्या प्रकाशवर्षानिमित्त टपाल तिकीट व नाणे प्रसिद्ध केले जाईल.  
- विदेशांत भारतीय दूतावासांत प्रकाश पर्वानिमित्त विशेष समारंभ होईल. 

बातम्या आणखी आहेत...