आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार मंत्र्यांच्या घरात सापडले कुटुंबियांचे नासलेले मृतदेह; शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर झाला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धमान - पश्चिम बंगालच्या असनसोल येथील हिंदुस्तान पार्क वसाहतीमध्ये स्थानिक उग्र दुर्गंधीमुळे त्रस्त होते. दिवसेंदिवस दुर्गंधी वाढत गेल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, सोमवारी काही पोलिस जवान घटनास्थळी दाखल झाले. दार उघडून पाहिले तेव्हा त्यामध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडले. यात एक वयोवृद्ध महिला आणि तिची मुलगी अशा दोघी होत्या. हे घर पश्चिम बंगालचे कामगार आणि ईएआय मंत्री मोलोय घटक यांचे असून त्या दोन्ही महिला त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात सापडलेल्या दोन्ही महिलांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. यातील एका महिलेचे नाव जयश्री घटक असून दुसरीचे नाव नीलम घटक असे आहे. जयश्री घटक ह्या मंत्री मोलोन घटक यांच्या मोठ्या भावजयी होत्या. मोलोन यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री आणि मुलगी नीलम याच घरात राहत होत्या. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या दोघी महिला आसपासच्या लोकांना जास्त बोलत नव्हत्या. कधी-कधीच घराबाहेर पडणाऱ्या त्या दोघी नेहमीच घरात असायच्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दिसल्याच नाहीत. तरीही शेजाऱ्यांना त्यावर संशय आला नाही. परंतु, काही दिवसांपूर्वीच या घरातून उग्र दुर्गंध येत होता. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत गेल्याने लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात सविस्तर तपास केला जात आहे.