आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क - पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पूनियाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूनियाने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासह 19 खेळाडूंना यावर्षीचा अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.
बॉक्सर मेरी कोमने स्वतःला सभेपासून केले दूर
48 वर्षीय दीपाने 2016 साली रिओ पॅरालंपिकमध्ये शॉट पुटच्या एफ-53 वर्गात रौप्य पदक पटकावले होते. निवृत्त न्यायमूर्ती एम. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या समितीने विजेत्यांची नावे जाहीर केली. दरम्यान, सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कॉमने वाद टाळण्यासाठी स्वत:ला सभेपासून दूर केले. तिचे प्रशिक्षक छोटेलाल यादव यांना द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.
या 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 19 खेळाडूंची निवड केली आहे. यांमध्ये क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि पूनम यादव, ट्रॅक मैदानातील तेजिंदर पाल सिंह तूर, मोहम्मद अनस, स्वपना बर्मन, फुटबॉलपटू गुरप्रीत सिंह संधू, हॉकीपटू सी.सिंह कंगुजम आणि नेमबाज अंजुम मुदगिल यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी खेळ, नेतृत्व क्षमता, शिस्त व खेळाविषयीची भावना यांच्याही चाचपणी केली जाते.
द्रोणाचार्य पुरस्कारसाठी तीन नामांकन
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार, टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता आणि अॅथलेटिक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंह ढिल्लो यांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. तर हॉकीचे यजमान पटेल, रामबीरसिंग खोखर (कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.