आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी दीपक आणि राखीच्या 2 व्हिडिओनी पुन्हा उडवली खळबळ, राखी म्हणाली - दीपकला आहे जीवघेणा आजार, दीपकनेही रडत रडत सांगितली आपबिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर, पंजाबः बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने प्रसिद्ध यूट्युबर दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचे जाहिर केले आहे. येत्या 31 डिसेंबर रोजी हे दोघे लॉस एंजिलिसमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या घोषणेनंतर दीपक कलालने जालंधरमध्ये त्याच्यासोबत गँगरेपचा प्रयत्न झाल्याचा आरोप लावला आहे. दीपक कलालने एक व्हिडिओ शेअर करुन रेल्वे स्टेशनवर तीन तरुणांनी त्याच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप केला आहे. खरं तर दीपकचा हा व्हिडिओ जुना आहे, पण पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दुसरीकडे राखीनेही एक व्हिडिओ शेअर करुन दीपिकला जीवघेणा आजार असल्याचे ती रडत रडत सांगतेय.


- दीपक माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करते, असे राखी रडत रडत व्हिडिओत म्हणतेय. पण राखीचा हा पुन्हा एक ड्रामा असू शकतो, अशी चर्चा आहे.


-दीपक अधूनमधून 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत असतो. 19 ऑक्टोबर 1972 रोजी जन्मलेला दीपिक त्याचा जन्म लॉस एंजिलिस येथे झाल्याचे सांगतो. पण तो पुणे आणि ग्वालियरचा असल्याचे म्हटले जाते.


-10 वीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्याने मुंबईतील वांद्रास्थित 'रिजवी कॉलेज'मधून कुकरीचा कोर्स केला होता. 2011 मध्ये दीपक काश्मिरला गेला होता. तेथे त्याने एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हायरल व्हिडिओने तो प्रसिद्ध झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...