आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepak Kalal Beaten On Road For Publicity Stunt, Rakhi Sawant Boyfriend And Rapper Manager Fake Video,

राखी सावंतच्या बॉयफ्रेंडच्या मारहाणीच्या व्हिडिओचे सत्य आले समोर, पब्लिसिटी स्टंटसाठी दीपक कलालने रस्त्यावर सर्वांसमोर खाल्ला मार 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सोशल मीडियावर काही दिवसांपुर्वी राखी सावंतचा बॉयफ्रेंड आणि यू-ट्यूबर दीपक कलालच्या लाइव्ह मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दीपकला मारताना दिसत होती. राखी सावंतने या व्हिडिओवर संशय घेत म्हटले होते की, दीपक तुला खरंच मारहाण होतेय की, हा पब्लिसिटी स्टंट आहे? आता वृत्त आहे की, हा पब्लिसिटी स्टंट होता. दीपकच्या पब्लिक स्टंटमागे दोन लोकांचा प्लान आहे. हा प्लान पुर्ण झाल्यावर मार खाणा-याचा आणि मारणा-यांचा फायदा होणार होता. भारतीय लोक हे खुप इमोशनल असतात आणि कुणालाही मार खाताना पाहून हळवे होतात. दीपक कलाल जेवढे व्हिडिओ शेअर करतो त्यावर यूजर्स हेट कमेंट करतात आणि डिसलाइन बटन दाबतात. यामुळे दीपकच्या अकाउंटवर हे लाइक-डिसलाइकचे बटन लपवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर करुन दीपिकने स्वतः खुप बिचारा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याला लोकांची सहानुभूती मिळावायची होती. तर दूसरीकडे दीपकाला मारहाण करणारी व्यक्ती सेलिब्रिटी असल्याचे बोलले जातेय. तसेच लोकांमध्ये आपली ओळख बनवण्यासाठी दीपक नावाच्या एका व्यक्तीने दीपकला मारहाण करण्याचा कट रचला. दीपकला मारहाण करणा-या व्यक्तीचे नाव दीपक असल्याचे बोलले जातोय. तो प्रोड्यूसरही आहे. त्याचे यूट्यूबवर रॅपर बादशाहसोबत एक गाणे आहे. यासोबतच ही दीपक नावाची व्यक्ती रॅपर Fazilpuria ची मॅनेजर आहे. 
 


 

बातम्या आणखी आहेत...