आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSP पती फोनवर म्हणाला- मी एक महिन्याची रजा घेऊन घरी येतोय, पण सांगितली नाही तारीख, रंगेहाथ पकडले पत्नीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक (हरियाणा) - समालखातील इनेलो नेताच्या मॉलवर सिक्योरिटी सुपरवाइजर म्हणून तैनात असलेल्या दीपकच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. दीपकची हत्या त्याच्या मित्राने नाही, तर प्रेयसीने केली होती. पोलिस चौकशीत खुलासा झाला की, दीपकचे एक वर्षापूर्वी रोहतकच्या सूर्यनगरातील यमुना नावाच्या एका महिलेशी फेसबुकवर मैत्री झाली होती.

 

दोघांनाही डीएसपीने एक रूममध्ये केले बंद
- यमुनाचा पती सुरेश कुमार सीआरपीएफ जम्मूमध्ये डीएसपी पदावर तैनात आहे. 7 दिवसांपासून दोघांमध्ये फोन आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग होऊ लागली. 29 सप्टेंबर रोजी दीपक यमुनाला भेटायला सूर्यनगर कॉलनीत पोहोचला. रात्री तेथेच थांबला आणि 30 सप्टेंबर रोजी सकाळी यमुनाचा पती घरी येऊन धडकला.

- दोघांना एकत्र पाहून डीएसपीला मोठा धक्का बसला. त्याने ताबडतोब दोघांना एक खोलीत कोंडले आणि यमुनाच्या माहेरच्यांना फोनवर माहिती दिली. यादरम्यानच यमुनाने दीपकला बळजबरी विष पाजल्याचा आरोप आहे. यामुळे दीपकचा तडफडून मृत्यू झाला.

- 30 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजता महिलेचा पती आणि भाऊ स्कूटीवर दीपकचा मृतदेह जिंद रोडवर फेकून आले. शहर पोलिसांनी याप्रकरणी बुधवार (10 ऑक्टोबर) रोजी यमुनाला अटक केली.

 

महिलेने सांगितली अवैध संबंधांची कहाणी
- पती सुरेश आणि भाऊ गौरववर मृतदेहाची दुरवस्था करण्याचा गुन्हा दाखल आहे. दोघेही फरार आहेत. इन्स्पेक्टर जगबीर कादयान यांनी सांगितले की, हत्येचा खुलासा कॉल डिटेल आणि लोकेशनमुळे झाला.

- पोलिसांनी यमुनाची कडक चौकशी केल्यावर पूर्ण घटना समोर आली. महिलेने दीपकसोबत तिच्या अवैध संबंधांची कहाणी पोलिसांसमोर सांगितली.

- एका आठवड्यापासून महिला दीपकला फोन आणि व्हॉट्सअॅपवर बोलू लागली होती. पोलिसांच्या मते, दीपकला यमुनाने बळजबरी सल्फासच्या गोळ्या खाऊ घातल्या. कुणालाही संशय येऊ नये म्हणून यमुनाने दीपकला बाइक घरी आणायला मनाई केली होती.

- दीपकने बाइक बस स्टँडवर उभी केली होती. यानंतर दीपकला उलटी झाली आणि तो जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला, परंतु पती सुरेश यमुनाचा भाऊ पोहोचपर्यंत घराबाहेर उभा होता. जवळजवळ 9 वाजता यमुनाचा भाऊ पोहोचला आणि दोघांनी दार उघडले तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता.


दीपकने मित्राला मॉलमध्ये जात असल्याचे सांगितले

दीपकच्या कुटुंबीयांनी त्याचा मित्र कालीवर आरोप केला होता की, कालीनेच दीपकची हत्या करून मृतदेह रोहतकमध्ये फेकला आहे. पोलिस चौकशी हे प्रकरण प्रेमसंबंधांचे निघाले. यामुळे पोलिसांनी कालीला क्लीन चिट दिली आहे.


पतीशी 3 दिवसांपूर्वी झाले होते बोलणे, सुटी घेऊन येत असल्याचे सांगितले होते
यमुनाचे आपल्या पतीशी फोनवर 3 दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. सुरेशने यमुनाला 3 दिवसांनंतर महिनाभराची सुटी घेऊन येत असल्याचे सांगितले. यादरम्यान दीपकचे यमुनाशी फोनवर बोलणे झाले तेव्हा यमुनाने दीपकला घरी बोलावले. परंतु सुरेशने यमुनाला घरी येण्याची तारीख सांगितलेली नव्हती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...