आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदकासह ऑलिम्पिक काेटा मिळवत दीपकचे बर्थडे सेलिब्रेशन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेहा : भारताच्या गुणवंत नेमबाज दीपक कुमारने एशियन नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये यशाचा दुहेरी धमाका उडवला. त्याने भारतीय संघाला ऑलिम्पिकचा काेटा मिळवून देत आपल्या ३१ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. दीपकने १० मीटर एअर रायफल इव्हेंट प्रकारामध्ये कांस्यपदकाची कमाई केली. यासह त्याने भारताचा नेमबाजीमधील १० वा ऑलिम्पिक काेटा पूर्ण केला. एका गटामध्ये एका संघाच्या दाेन खेळाडूंना काेटा मिळू शकताे. दिव्यांश सिंग पवारने यापूर्वीच या गटामध्ये ऑलिम्पिकचा काेटा मिळवला हाेता. दीपकने आता या गटात बाजी मारली. त्याने मंगळवारी ३१ वा वाढदिवस पदक जिंकून साजरा केला.


गत वर्षीच्या विश्वचषकातील कांस्यपदक विजेत्या दीपकने आता आपल्या गटाच्या पात्रता फेरीमध्ये चांगली सुरुवात केली. त्याने ६२६.८ च्या स्काेअरसह तिसरे स्थान पटकावले. हीच लय कायम ठेवताना त्याने फायनलमध्ये कांस्यपदक पटकावले. त्याने २२७.८ गुणांची फायनलमध्ये कमाई केली. या गटात चीनचा ल्यु युकूनने २५०.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

एलावेनिल पाचव्या स्थानी, अंजुम अपयशी
भारताची अव्वल महिला नेमबाज एलावेलिन ही महिलाच्या गटात पाचव्या स्थानावर राहिली. तिने १० मीटर गटात पदकाचा प्रयत्न केला. मात्र, तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तिने १८७.१ गुणांसह पाचवे स्थान गाठले. या गटात चीनची कियान यंग सुवर्णपदकाची मानकरी ठरली. दरम्यान भारताच्या अंजूम आणि अपूर्वी चंदेला या गटाची फायनल गाठता आली नाही. त्यांंची पात्रता फेरीतील कामगिरी सुमार ठरली.

२००४ पासून वाढत अाहे काेटा
गत १५ वर्षांपासून नेमबाजीच्या ऑलिम्पिकमधील इव्हेंटसाठी भारताच्या खेळाडूंकडून काेटा मिळवण्याचा आलेख उंचावत आहे. २००४ पासून यामध्ये झपाट्याने प्रगती साधल्या जात आहे. २००४ मध्ये आठ नेमबाज या स्पर्धेसाठी पात्र ठरले हाेते. याची २००८ मधील संख्या ९, २०१२ मध्ये ११ आणि २०१६ मध्ये १२ अशी वाढत गेली आहे. आता २०२० च्या टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे १० नेमबाज पात्र ठरले आहेत.


पदकाच्या बाबतीत संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह चार पदके जिंकली आहेत. २००४ मध्ये पहिल्यांदा राज्यवर्धन राठाेडने पुरुष डबल ट्रॅप प्रकारात राैप्यपदक पटकावले .२००८ मध्ये अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. २०१२ मध्ये विजय कुमारने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये राैप्य आणि गगन नारंगने १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदकाची कामई केली. २०१६ मध्ये भारतीय नेमबाज पदकासाठी अपयशी ठरले. आता टाेकियाेमध्ये माेठी आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...