आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नवत वाटावा असा होता दीपिका-रणवीरच्या लग्नाचा थाट, पाहुण्यांसाठी ठेवण्यात आली होती एक अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. लग्नानंतरचा दीपिकाचा हा दुसरा वाढदिवस आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 रोजी दीपिका अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध झाली होती. गेल्यावर्षी दीपिकाने रणवीरसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. पण यावर्षी मात्र आजच्या दिवशी दीपिका लखनऊमध्ये असल्याचे समजते. येथे ती 'शीरोज' हँगआऊट कॅफेत आपला वाढदिवस साजरा करत असल्याची बातमी आहे. शीरोज कॅफे अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिला चालवतात. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित 'छपाक' या चित्रपटात दीपिका झळकणार असून येत्या 10 जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या बिझी असलेली दीपिका याच निमित्ताने आज लखनऊत आहे. येथे रणवीर तिच्यासोबत नसणार आहे. 'छपाक'च्या टीमसोबत दीपिका येथे आली आहे. 
 

  • स्वप्नवत वाटावा असा होता रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा थाट...

दीपिका आणि रणवीर यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. दीपिका आणि रणवीर यांचे 14 नोव्हेंबर 2018 रोजी कोकणी पद्धतीने लग्न केल होते. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला लग्न सोहळा दुपारी 4.45 वाजता संपन्न झाला होता. या सोहळ्याला केवळ 30 नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा समावेश होता.  कोकणी आणि सिंधी अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने इटलीच्या लेक कोमो इथल्या 'विला डेल बालबीएनलो' या निसर्गरम्य ठिकाणी हा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार होता. दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येऊ दिले नव्हते. पण सोशल मीडियावर #DeepikaWedsRanveer हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.  

  • पाहुण्यांसमोर ठेवण्याच आली होती एक अट...

रणवीर आणि दीपिका यांनी स्वतः त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. दोघांनीही लग्नातले कोणत्याही प्रकारचे फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवली होती.  या सोहळ्यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने  अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करू नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याची चर्चा होती.