आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपवीरचे रिसेप्शन: हॉटेलचे 24 तासांचे भाडे आहे एवढे, हॉटेल स्टाफने दिली पुर्ण माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क. इटलीच्या लेक कोमोमध्ये लग्न केल्यानंतर आता बेंगळुरुमध्ये दीपिका रणवीरचे रिसेप्शन आहे. मंगळवारी सकाळी हे दोघं मुंबईमधून बेंगळुरुला रवाना झाले. बुधवारी द लीला हॉटेलमध्ये त्यांचे रिसेप्शन होईल. हे रिसेप्शन दीपिकाच्या पालकांकडून होणार आहे. त्यांनी हॉटेलचा सर्वात मोठा हॉल बॉलरुमला रिसेप्शनसाठी बुक केले आहे. आम्ही द लीलामध्ये बोलून या रिसेप्शनला होणा-या खर्चाविषयी आणि रिसेप्शनविषयी माहिती काढली. 

 

रिसेप्शन होणारा हॉल कसा आहे 
- द लीलाच्या ग्रँड बॉलरुमध्ये रिसेप्शन होणार आहे. सेलिब्रेशनसाठी हा येथील सर्वात मोठा हॉल आहे. हॉटेलमध्ये सेलिब्रेशनसाठी लहान-मोठे मिळून एकूण 18 वेन्यू आहेत.


- ग्रँड बॉलरुमची साइज 4400 स्क्वेअर फूट आहे. 
- सिटिंग कॅपेसिटीविषयी बोलायचे तर यामध्ये थिएटर स्टाइलमध्ये 600, क्लासरुम 240, यू-शेप 80, बोर्ड रुम 80, सिट डाउन बुफे 240, क्लस्टर स्टाइल 200 कॅपेसिटी आहे. 
- या हॉलमध्ये एकुण 800 लोक एकाच वेळी येऊ शकतात. 

 

हॉलचे चार्ज किती 
- हॉटेलमधून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँड बॉलरुमला डिनरसाठी बुक केले तर प्रत्येकी व्यक्तीचे 3 हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच 500 लोकांचा कार्यक्रम असेल तर 15 लाख रुपये रिसेप्शनमध्ये खर्च होतात.
- जर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी हे बुक केले तर प्रत्येकी व्यक्तीसाठी 7200 रुपये खर्च येतो. म्हणजेच यामध्ये 500 लोकांचा खर्च 36 लाख रुपये एवढा येतो.
- जेवणातील मेन्यू तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवु शकता.
- संपुर्ण दिवसासाठी हॉल बुक करायचा असेल तर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हॉल बुक केला जाऊ शकतो. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...