• Home
  • Bollywood
  • News
  • Deepika called Ranveer 'Cleopatra', Ranveer wrote in the comment 'You are the secret of my glowing skin'

फनी / दीपिका रणवीरला म्हणाली क्लियोपेट्रा, कमेंटमध्ये रणवीरने लिहिले - 'माझ्या सतेज त्वचेचे रहस्य तू आहेस'

रणवीरनेही शेअर केला दीपिकाचा युनिक व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम

Feb 15,2020 02:03:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी श्रीलंकाला गेले होते. जेथून गुरुवारी ते परतले आहेत. दीपिकाने व्हॅलेन्टाईन डेला रणवीरचा फेसपॅक लावलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'दुसऱ्या बातमीत जसे की तुम्ही पाहू शकता क्लियोपेट्रा खूप व्यस्त आहे. दीपिकाच्या या फोटोवर रणवीरदेखील स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. त्याने लिहिले, 'माझ्या सतेज त्वचेचे रहस्य तर... तू आहेस.'


आठवडाभर शेअर केले यूनीक फोटो...


यादरम्यान दीपिकाने आपल्या इंस्टाग्रामवर सलग अनेक फोटो शेअर केले, जे त्यांचे व्हॅकेशन एन्जॉयमेंट व्यक्त करते. या सर्व फोटोंसोबत तिने #his&hers हॅशटॅगदेखील यूज केले आहे. पहिल्या दिवशी दीपिकाने पासपोर्टचा फोटो शेअर केला होता. दुसऱ्या फोटोमध्ये दोन जोडी स्लीपर्ससोबत दीपिकाने लिहिले होते - मला मार्ग दाखवण्यासाठी तिसऱ्या फोटोमध्ये तिने दोन छत्र्या पोस्ट केल्या होत्या. चौथ्या फोटोमध्ये दोन सायकल होत्या. पाचव्या फोटोमध्ये स्विमिंग गॉगल्स आणि स्विमफिन होते. सहाव्या फोटोमध्ये टरबूजाच्या दोन प्लेट्स दिसत होत्या.


रणवीरने शेअर केला दीपिकाचा व्हिडिओ...


याचदरम्यान रणवीरनेदेखील दीपिकाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. विंटेज स्टाइलमध्ये बनलेल्या या व्हिडिओमध्ये दीपिका गली बॉयचे गाणे 'अपना टाइम आएगा' गातांना दिसत आहे. रणवीरने दीपिकासाठी लिहिले की, त्याला त्याची चीयर लीडर मिळाली आहे.' दोघांच्याही अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर दीपिका-रणवीरसोबत '83' मध्ये दिसणार आहे. तसेच ऋषी कपूरसोबत 'द इंटर्न' च्या रीमेकमधेही दिसणार आहे.

X