आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर सासूबाईंसोबत दिसले दीपिकाचे जबरदस्त बाँडिंग, सासरच्या लोकांसोबत काढलेला फोटो होतोय व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवुडमधील 'हॉट कपल' अशी ओळख असलेल्या 'दीपवीर'ने नुकताच संसार थाटला आहे. 14 आणि 15 नोव्हेंबरला या दाम्पत्याने इटलीतील लेक कोमो येथे कोकणी आणि सिंधी रिती‍रिवाजानुसार सातफेरे घेतले. लग्नानंतर हे दाम्पत्य मुंबईला परतले आहे. दीपिकाने सासरच्या मंडळींसोबत फोटो सेशन केले. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दीपिका आणि तिचे सासरचे लोक दिसत आहेत. दीपिका आणि सासूबाई यांच्यात जबरदस्त बाँडिंग दिसत आहे.

 

सासूबाईंसोबत जबरदस्त बाँडिंग

> फोटोत लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे दीपिका आणि अंजू भवनानी (रणवीरची आई) यांच्यात झालेले जबरदस्त बाँडिंग. दीपिकाने सासूबाईंचा हात तिच्या हातात धरलेला दिसत आहे. हा फोटो 'दीपवीर' यांच्या कोकणी परंपरेनुसार झालेल्या लग्नाचा आहे. रणवीर सिंगचे वडील जगजीत भवनानी आणि त्याची बहीण रितिका भवनानी हेही फोटोत दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोची एकच चर्चा सुरु झाली आहे.

 

'ये दिवानी तो भवनानी हो गई'

> 15 नोव्हेंबरला दीपवीरचे सिंधी परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर जगजीत भवनानी यांनी आपल्या खास शैलीत दीपिकाचे स्वागत केले. सुनेचे स्वागत करताना जगजीत  म्हणाले की, "ये दिवानी तो भवनानी हो गई, ये दीवानी मस्तानी हो गई"

 

दीपिकापेक्षा 5 महिन्यांनी मोठा आहे रणवीर

> रणवीर दीपिकापेक्षा केवळ 5 महिन्यांनी मोठा आहे. दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी कोपेनहेगेन (डेनमार्क) मध्ये झाला होता तर 6 जुलै 1985 रोजी रणवीर सिंगचा जन्म मुंबई येथे झाला होता. दीपवीर यांनी पहिल्यांदा दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या 'गोलियों की रासलीला: राम-लीला' (2013) चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघांचा अफेअरला सुरू झाले होते. काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांनी 'फाइंडिंग फॅनी' (2014), 'बाजीराव मस्तानी' (2016) आणि 'पद्मावत' (2018) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...