आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS : सर्वात जास्त फीस घेण्याच्या बाबतीत पुन्हा एका टीव्हीच्या 'बहू'ने मारली बाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल रियालिटी शो 'बिग बॉस'चे 12 वे सीजन 18 सप्टेंबरला सुरु होत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी बिग बॉसमध्ये टीव्हीची प्रसिध्द बहू 'ससुराल सिमर का'ची अभिनेत्री दीपिका कक्कड एंट्री घेत आहे. सर्वात इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे दीपिकाला शोमध्ये आणण्यासाठी हिना खानपेक्षा दुप्पट फीस ऑफर करण्यात आली आहे. बिग बॉस 11 मध्ये हिना हायएस्ट पेड कंटेस्टेंट होती. गेल्या सीजनमध्ये हीना खुप चर्चेत होती. यामुळे यावेळी आता दीपिकाकडून अशाच अपेक्षा आहेत. 


दीपिकाला मिळू शकतात एवढे पैसे 
- बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार हिना खानला मागच्यावेळी एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाखांची ऑफर देण्यात आली होती. तर यावेळी दीपिकाला डबल फीस म्हणजेच 14 ते 16 लाख रुपये ऑफर करण्यात आले आहेत. 
- मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार दीपिका कक्कड आणि तिचा पती शोएबशी शोसाठी संपर्क करण्यात आला होता. दीपिका आपल्या आईसोबत शोमध्ये येऊ शकते असेही बोलले जात होते. परंतू ती या शोमध्ये कोणासोबत एंट्री घेणार आहे हे अजुनही कन्फर्म नाही. 
- दीपिका 'पलटन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...