आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padkone Birthday Special Deepika Was Chosen By Farah, Not For 'Om Shanti Om' But For 'Happy New Year'.

'ओम शांती ओम'साठी नव्हे 'हॅपी न्यू इयर'साठी फराहने केली होती दीपिकाची निवड, अशी लागली होती दीपिकाला बी टाऊनची लॉटरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  दीपिका पदुकोण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. आज वयाची 34 वर्षे पूर्ण करणा-या दीपिकाला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेऊन 14 वर्षे झाली आहे. 14 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने यशोशिखर गाठले आहे. शाहरुख खानसोबत 2007 मध्ये 'ओम शांती ओम' या सिनेमातून दीपिकाने रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण केले. हिमेश रेशमियाच्या एका म्युझिक अल्बममध्ये फराह खानने दीपिकाला पाहिले होते. तिथेच फराहने दीपिकाला तिच्या सिनेमासाठी साइन करण्याचे ठरवले. मात्र हा सिनेमा 'ओम शांती ओम' नव्हता. 

  • 'हॅपी न्यू इयर'साठी झाली होती दीपिकाला विचारणा...

फराह खान त्यावेळी 'ओम शांती ओम' या सिनेमावर नव्हे तर 'हॅपी न्यू इयर' या सिनेमावर काम करत होती. याच सिनेमासाठी फराहने दीपिकाला विचारणा केली होती. सर्वकाही जुळून आले होते. पण काही कारणास्तव 'हॅपी न्यू इयर' सिनेमा पुढे ढकलण्यात आला आणि फराहने 'ओम शांती ओम' सिनेमा करायचे ठरवले. मग दीपिकाला या सिनेमासाठी फराहने फायनल केले. त्यामुळे 'हॅपी न्यू इयर'ऐवजी 'ओम शांती ओम' या सिनेमातून दीपिकाचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. विशेष म्हणजे 2007 मध्ये 'ओम शांती ओम' सिनेमा रिलीज झाला आणि त्याच्या सात वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये 'हॅपी न्यू इयर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी या सिनेमासाठी दीपिका नाही तर कतरिनाला फराहची पसंती होती. पण कतरिना 'धूम 3' आणि 'बँग बँग' या सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी होती. तिच्याकडे फराहसाठी तारखा नव्हत्या. म्हणून फराहने 'ओम शांती ओम'च्या टीमसोबत 'हॅपी न्यू इयर' करायचे ठरवले. 

बातम्या आणखी आहेत...