आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म \'छपाक\' मधील दीपिकाचा फर्स्ट लूक झाला लॉन्च, अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरच्या भूमिकेत दीपिका पदुकोणला ओळखणे झाले कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण लग्नानंतर जास्त चर्चेत असते आणि आता तिच्या फिल्ममुळे ती चर्चेत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'छपाक', या फिलमधील दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.  

ही फिल्म एका सत्य घटनेवर आधारित आहे. या फिल्ममध्ये ऍसिड अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवाल या मुलीची कहाणी दाखवली जाणार आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये दीपिका हसत आरश्याच्या मागून पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावर जळाल्याच्या खुणा आहेत आणि आयब्रोजदेखील गायब आहेत. दीपिकाने 'छपाक' मधील आपल्या लुकचा फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. तिने फोटोवर कॅप्शन लिहिले, 'A character that will stay with me forever...#Malti'. या फिल्ममधील दीपिकाचा हा फर्स्ट लूक... 

या फिल्मची शूटिंग दिल्लीमध्ये सुरु झाली आहे. दीपिका पदुकोण मालती नावाची भूमिका साकारणारा हे, जिच्या आयुष्यात अखंड संकटे येत राहतात पण ती त्यांच्याशी तितक्याच हिमतीने लढत असते. या फिल्मच्या माध्यमाने दीपिका पदुकोणचे बॅनर के. ए. एंटरटेनमेंट याचीदेखील सुरुवात होता हे. फॉक्स स्टार स्टूडियो के ए एंटरटेनमेंट आणि मृग फिल्म मिळून ही फिल्म बनवत आहेत. ही फिल्म 10 जानेवारी 2020 ला रिलीज होईल. 

या फिल्मसाठी दीपिका पदुकोणने लक्ष्मी अग्रवाल हिच्याशी निगडित असलेली सर्व माहिती सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे मिळवली आहे. याव्यतिरिक्त तिने लक्ष्मी अग्रवाल हिची भेट घेऊन तिच्याशी संवाद देखील साधला होता. ज्यामुळे तिला खूप महतवाच्या गोष्टी वाचायला आणि बघायला मिळाल्या. 

दीपिका पदुकोण लवकरच मेघना गुलजारद्वारा को-प्रोड्यूस केली जाणारी फिल्म 'छपाक' मध्ये अभिनय करताना दिसेल. दीपिका ही फिल्म प्रोड्यूसदेखील करत आहे. या फिल्मच्य माध्यमाने दीपिका पहिल्यांदा फिल्म प्रोड्यूस करत आहे.