आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमित कर्ण, बॉलिवूड डेस्क, मुंबई: देशातील निर्बंध आणि स्वातंत्र्य यांच्यातील सतत संघर्षात, स्त्रीला भीती न बाळगता जगणे सर्वात कठीण आहे. सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि वैयक्तिक अशा प्रत्येक आघाडीवर त्यांच्यावर भीतीची सावली कायम असते. एखादा अपघात कधी त्यांचे आनंदाचे जीवन दुःखाने भरुन देईल हेदेखील सांगता येत नाही.
'छपाक' अशा देशाची कथा आहे, जिथे सर्वाधिक अॅसिड हल्ले होतात. अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतलेली ही सत्य घटना आहे. तिचा जीवनपट आणि अॅसिडच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या तिच्या प्रयत्नांविषयी देशाला माहिती आहे. परंतु, अद्यापपर्यंत यंत्रणेकडून कठोर पावले उचलली गेली नाहीत. अॅसिडच्या विक्रीवर नियंत्रण तर आहे, परंतु त्यावर अद्याप बंदी आलेली नाही.
चित्रपटाची नायिका 19 वर्षांची आनंदी आणि सुंदर मालती आहे, तिचीही अगदी सामान्य स्वप्नं आहेत, पण तिच्या स्वप्नांना बशीर खान उर्फ बब्बूची नजर लागते. जेव्हा मालती बब्बूच्या वाईट हेतूंना नाकारते, तेव्हा तो तिच्यावर अॅसिड हल्ला करतो. यात त्याला साथ मिळते ती परवीन शेख नावाच्या त्याच्या नातेवाईकाची, जी स्वतः एक महिला आहे. सुरुवातीला या घटनेची संशयाची सुई मालतीचा प्रियकर राजेशवर जाते. मालतीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. या परिस्थितीत मालती आणि तिच्या कुटुंबीयांना शिराझ आणि वकील अर्चना यांची साथ मिळते. पत्रकारिता आणि नोकरी सोडून अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांच्या हक्कांसाठी स्वयंसेवी संस्था चालविणा-या अमोलचीही साथ मालतीला मिळते.
ऐंशीच्या दशकात 'छपाक' सारख्या चित्रपटांना मुख्य प्रवाहातील निर्माते आणि अभिनेते आणि अभिनेत्रींचा आंशिक पाठिंबा मिळत असे. स्वत: दीपिका पदुकोणने मालतीच्या भूमिकेत ते मिथक मोडले आहे. तलवार आणि राजी यांच्यासारखे दर्जेदार चित्रपट देणा-या मेघना गुलजार यांनी या चित्रपटाच्या टेंप्रामेंटचा सूर या चित्रपटांपेक्षा उंच ठेवला आहे. सर्व पात्रांना मेलोड्रॅमेटिक होऊ दिले नाही. ही कथा एक गंभीर सामाजिक जबाबदारी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मेघना गुलजार यांना दीपिका पदुकोण, विक्रांत मेस्सी, मधुरजित सार्गी यांच्यासह उर्वरित कलाकारांची उत्तम साथ मिळाली आहे. मालतीच्या भूमिकेत दीपिकाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. विक्रांत मैसीने अमोलची भूमिका उत्तम निभावली आहे. मधुरजित सार्गी यांनी वकिलाची भूमिका जीवंत केली आहे. चित्रपटामध्ये खासगी आयुष्याच अॅसिड हल्ला सहन केलेल्या महिलांनीही काम केले आहे. शब्दांचे जादूगार गुलजार यांनी चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. शंकर एहसान लॉय यांचे संगीत आहे, परंतु यावेळी गाणी हृदयात खोलवर जाऊ शकली नाही.
हा चित्रपट अनेक प्रकारे खास आहे. हा चित्रपट समाजात घडणाऱ्या हिंसक गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.