Home | News | 50 Sexiest Asian Women 2018 Deepika padukone beat priyanka chopra And become first S exiest Asian Women of the year

Sexiest Asian Women 2018: सौंदर्यात दीपिका पदुकोणने दिली प्रियांका चोप्राला मात, ठरली आशियातील सर्वात सेक्सी महिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:03 PM IST

टॉप 5 मध्ये 'मेरी दुर्गा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या अभिनेत्रींनीही पटकावले स्थान

 • 50 Sexiest Asian Women 2018 Deepika padukone beat priyanka chopra And become first S exiest Asian Women of the year

  मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तर दीपिकाने अभिनेता रणवीर सिंहसोबत संसार थाटला आहे. दरम्यान एका सर्व्हेत दीपिका पदुकोणला आशिया खंडातील सर्वात सुंदर महिलेचा मान मिळाला आहे. 50 Sexiest Asian Women 2018 नुसार, दीपिकाला वर्क-इम्पॅक्ट, मीडिया कव्हरेज आणि वोटिंगवरुन आशियातील सर्वात सेक्सिएस्ट महिलेचा किताब देण्यात आला आहे. तर या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राने दुसरे स्थान पटकावले आहे. सौंदर्यात दीपिकाने प्रियांकाला मात दिली आहे.

  Sexiest Asian Women 2018 च्या टॉप-5 मध्ये दोन टीव्ही अभिनेत्रींचा समावेश...
  - सेक्सिस्ट एशियन वुमनच्या टॉप-5 यादीत टीव्ही अभिनेत्री निया शर्मा आणि शिवांगी जोशी यांनी स्थान पटकावले आहे.


  - 'जमाई राजा', 'मेरी दुर्गा' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री नियाला सेक्सिएस्ट एशियन वुमन सर्व्हेत तिसरे स्थान मिळाले आहे. तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत लीड रोल साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

  - टॉप-5 लिस्टविषयी सांगायचे म्हणजे पहिल्या स्थानावर दीपिका, दुस-यावर प्रियंका, तिस-या स्थानावर निया शर्मा, चौथ्या स्थानावर माहिरा खान आणि पाचव्या स्थानावर शिवांगी जोशी आहे. गेल्या वर्षी टॉप फाइव्हमध्ये आलिया भट आणि टीव्ही अॅक्ट्रेस दृष्टी धामी यांना स्थान मिळाले होते.


  - टॉप-10 विषयी सांगायचे म्हणजे यामध्ये टीव्ही अॅक्ट्रेस हिना खान आणि नीती टेलर यांचेही नाव आहे. 50 Sexiest Asian Women 2018 ची संपूर्ण यादी शुक्रवारी ऑफिशिअली रिलीज केली जाणार आहे.


Trending