आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone And Priyanka Chopra To Team Up For Sanjay Leela Bhansalis Hira Mandi

संजय लीला भन्साळींच्या बोल्ड चित्रपटात पुन्हा एकत्र दिसू शकतात प्रियांका-दीपिका, हा आहे भन्साळींचा आगामी प्रोजेक्ट  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' हा चित्रपट गेल्यावर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर ते 'हीरा मंडी' या आगामी मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले आहेत. हा चित्रपट गंगूबाई कोठेवालीच्या जीवनावर आधारित असेल. तिला कामाठीपु-याची मॅडमदेखील म्हटले जायचे. गंगूबाईला कामठीपु-यामध्ये अनेक वेश्यालये चालवण्यासाठी ओळखले जात होते. या चित्रपटाविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, भन्साली यांनी आपल्या आवडत्या तारका दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राला यासाठी अॅप्रोच केले आहे. 


सूत्रांच्या मते, चित्रपटात दोन समांतर महिला मुख्य भूमिकेत असतील. यासाठी भन्साळी दीपिका आणि प्रियांकाच्या नावाचा विचार करत आहेत. दोघींनी यापूर्वी भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये एकत्र काम केले आहे. सध्या भन्साळी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. चित्रपटात गंगूबाईची आयकॉनिक भूमिका कोण साकारेल हे अजून भन्साळींनी निश्चित केलेले नाही. 


भन्साळींच्या चित्रपटाशी निगडीत काही खास गोष्टी...
- या चित्रपटाचा सेट लार्जर दॅन लाइफ असेल आणि यात हीरा मंडी जशीच्या तशी साकारण्यात येईल. 
- यात गाणी आणि डान्सर नंबर असतील. 
- यात त्या काळातील सेक्स वर्कर्सच्या अडचणी दाखवल्या जातील. 
- करण जोहरदेखील आपल्या 'कलंक' चित्रपटात 'हीरा मंडी'ची काही दृश्ये दाखवणार आहे. 


प्रियांका-माधुरीचा हॉलिवूडपट पुढे ढकलला...
प्रियांका चोप्रा आणि माधुरी दीक्षित एका हॉलिवूड चित्रपटात सोबत काम करणार असल्याची चर्चा होती. हा चित्रपट अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीसाठी बनवण्यात येणार होता. त्यात माधुरीच्या आयुष्याचा उल्लेखही करण्यात येणार होता. मात्र तो ब-याच दिवसांपासून रखडला होता. प्रियांका या चित्रपटाशी निर्माती म्हणून जोडली होती. आता निर्मात्यांनी हा चित्रपट पुढे ढकलल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माधुरी यूएसला गेल्यानंतरची माहिती यात दाखवण्यात येणार होती. यात माधुरी काही मजेशीर गोष्टी शेअर करताना दिसणार होती. मात्र काही बदल करण्यासाठी तुर्तास याचे काम थांवबण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...