आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिकाचे लग्न : मीडिया रिपोर्टनुसार मुंबईपासून 6 हजार किमी दूर 10 हजार वर्षे जुन्या या ठिकाणी होऊ शकते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचे लग्न याच वर्षी 14 आणि 15 नोव्हेंबरला होईल. दोघांनी लग्नाची तारीख ट्वीटरवर शेअर केली आहे. दोघे 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही अफवा अशाही आहेत की, दोघे दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न करतील. मीडिया रिपोर्ट्स आणि नीकटवर्तीयांच्या माहितीनुसार लग्न इटलीच्या लेक कोमोमध्ये होईल. 


रणवीर-दीपिकाने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पोस्ट केली. त्यात 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी दोघे लग्न करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र या पत्रिकेत लग्न कुठे होणार याचा मात्र उल्लेख केलेला आढळलेला नाही. 


10 हजार वर्षे जुना तलाव 
लेक कोमो जवळपास 10 हजार वर्षे जुना आहे. याचा आकार इंग्रजीतील 'Y' अक्षरासारखा आहे. या तलावाड अड्डा नदीचे बर्फाचे पाणी येते. हा इटलीतील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. 146 स्क्वेअर किलोमीटर परिसरात तो पसरला आहे. याची खोली जवळपास 1300 फूट आहे. निसर्ग सौदर्यामुळे रोमन काळापासून हा तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. लेक कोमोच्या आसवपास वसलेल्या गावांमधील रंगीत घरे आणि येथील गॉथिक आर्किटेक्चर येथील सौंदर्य अनेक पटींनी वाढवते. 


रोमनने सुरू केला विकास 
लेक कोमोचा संबंध अनेकांशी आहे. पण रोमन सत्तेमध्ये याचे महत्त्व वाढले. रोमननी रेजिनाच्या मार्गे त्याचे निर्माण केले आहे. ते या लेकच्या पश्चिमेकडील किनाऱ्याच्या दोन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. रोमन सम्राट आणि सैन्य नेता ऑगस्टसने लेक कोमोचा वापर पो आणि राइन व्हॅलिजमध्ये बिझनेससाठी केला. 


नाव बदलले  
49 ईसवीसनपूर्व कोमो शहरात ज्युलियस सिझरने 5000 जणांच्या मदतीने सत्ता सुरू केली होती. त्यांनी या तलावाचे नाव बदलून लारियस ठेवले. अनेक गाण्यांमध्ये हे नाव ऐकले जाते. कोमोला 'नोवम कॉमम' नावानेही ओळखले जाते. त्या काळात 'मजिस्ट्ररी कोमासिनी' (मोठे दगड कापून त्याला नवा आकार देणे) च्या माध्यमातून युरोपचा विकास करण्यात आला. रोमन शासन काळात कोमोचा विकास वेगाने झाला. 


यासाठीही प्रसिद्ध 
दुसऱ्या महायुद्धात कोमोमध्ये पर्यटकांची संख्या घटली. त्यावेळी या लेकच्या उत्तर भागावरील डोंगोवर मुसोलिनीने कब्जा केला होता. पण आता ही जगातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक आहे. कोमो रेशम इंडस्ट्रीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे लोक जगभरातून रेशम फॅब्रिक डिझाइन, प्रिटिंग सारखी कला शिकायला येतात. बरोबरच फर्निचर डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठीही जगात प्रसिद्ध आहे. विला एर्बामध्ये वर्ल्ड फेमस एक्झिबिशन सेंटरही आहे. 

 

असा करा कोमोचा प्रवास 
इंडियाहून इटलीतील लेक कोमोला जाण्यासाठी फ्लाइट घ्यावी लागेल. फ्लाइट दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू किंवा इतर शहरांतूनही मिळतात.  इटलीच्या मिलान एअरपोर्टसाठी ही फ्लाइट घ्याली लागते. तिथून लेक कोमो 85 किमी मुंबईहून त्याचे अंतर जवळपपास 6 हजार किमी दूर आहे. 

 

मुंबई ते मिलान फ्लाइट : जवळपास 20 हजार रुपये 
दिल्ली ते मिलान फ्लाइट : जवळपास 17 हजारांपासून 
कोलकाता ते मिलान फ्लाइट : जवळपास 23 हजार रुपये 

 

मे ते सप्टेंबर बेस्ट सिझन 
 लेक कोमो फिरण्याचा बेस्ट काळ मे ते सप्टेंबरदरम्यान असतो. जुलै आणि ङॉगस्टमध्ये येथे प्रचंड गर्मी असतो. कारण त्यादरम्यान अॅव्हरेज टेम्प्रेचर 22 डिग्रीच्या आसपास असते. कधी कधी तापमान 35 डीग्रीपर्यंत पोहोचते. 

 

इथे फिरा 
> लेक कोमोतील सर्वात प्रसिद्ध टाऊन बेलाजियो आहे. बोटच्या माध्यमातून येथे जाणे सर्वात उत्कृष्ट आहे. त्यामुळे तुम्हा चारही बाजुंचा नजारा पाहायला मिळतो. 

बातम्या आणखी आहेत...