Home | News | Deepika Padukone And Ranveer Singh Fly To Italy For Wedding

रणवीर-दीपिका लग्नासाठी पोहोचले 10 हजार वर्षांपुर्वीच्या या ठिकाणी, रोचक आहे या ठिकाणाचा इतिहास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 02:39 PM IST

असा करा लेक कोमोचा प्रवास

 • Deepika Padukone And Ranveer Singh Fly To Italy For Wedding

  न्यूज डेस्क. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नासाठी शुक्रवारी रात्री इटलीला रवाना झाले. दोघंही मुंबई एयरपोर्टवर व्हाइट कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये दिसले. मीडिया रिपोर्ट्स आणि जवळच्या सुत्रांनुसार लग्न इटलीच्या लेक कोमोमध्येच होईल. लग्नाची तारीख 14 आणि 15 नोव्हेंबर आहे. दोघंही गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

  लग्नाची तारीख केली होती शेअर
  रणवीर-दीपिकाने 21 अक्टोबरला आपल्या लग्नाची डेट शेअर करत लिहिले होते की, "आम्हाला तुम्हाला सांगताना खुप आनंद होतोय की, आमच्या कुटूंबाच्या आशिर्वादाने आमचे 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 ला लग्न होत आहे. एवढ्या वर्षात तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि स्नेह दिला, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आमचा सुरु होणारा प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या या सुंदर प्रवासासाठी आम्हाला तुमचे आशिर्वाद हवे आहेत. खुप सारे प्रेम. दीपिका आणि रणवीर"


  10 हजार जुने लेक
  लेक कोमो जवळपास 10 हजार वर्षे जुने आहे. या लेकचा आकार इंग्रजी लेटर 'Y' सारखा आहे. ग्लेशियर मूमेंटमुळे लेकला हा आकार मिळाला. या लेकमध्ये अड्डा नदीचे बर्फाळ पाणी येते. हे इटलीतील तिसरे मोठे सरोवर आहे. हे 146 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरले आहे. हे 1300 फूट खोल आहे. येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे रोमन काळापासूनच हे प्रेक्षकांना पसंत पडते. लेक कोमोच्या आजुबाजूच्या गावात रंगी-बिरंगी घर तयार झाले आहेत आणि येथील गॉथिक आर्किटेक्चर या ठिकाणाची सुंदरता अनेक पटींनी वाढवते.


  रोमनने सुरु केली होती डेव्हलपमेंट
  लेक कोमोचा संबंध अनेक जातींसोबत राहिला आहे. पण रोमनच्या ताब्यानंतर या सरोवराचे महत्त्व अधिक वाढले. रोमन यांनी रेजिनाच्या रस्त्याची निर्मिती केली. हा रस्ता सरोवराच्या पश्चिमी किना-याच्या दोन मुख्य रस्त्यांना जोडतो. रोमन सम्राट आणि सैन्य नेता ऑगस्टस यांनी लेक कोमोचा वापर पो आणि राइन वॅलीजचा बिझनेस केला.

  जेव्हा बदलण्यात आले नाव
  इसवी सन पूर्व 49 मध्ये कोमो शहरात ज्युलियस सीजरने 5000 लोकांसोबत शासन सुरु केले होते. त्यावेळी या सरोवराचे नाव बदलून लारियस असे ठेवण्यात आले होते. सरोवराचे हे नाव अनेक गाण्यांमध्ये आजही ऐकू येते. कोमोला 'नोवम कॉमम' या नावानेही ओळखले जाते. त्याकाळात 'मजिस्ट्ररी कोमासिनी' (मोठमोठ्या दगडांना कापून नवीन आकार देणे) यूरोपचा विकास गेला. रोमन शासन काळात तेजीने याचा विकास झाला.


  या दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध
  दुस-या महायुद्धाच्या काळात कोमोच्या पर्यटनात घट झाली होती. त्याकाळात सरोवराच्या उत्तर भागात मुसोलिनीने ताबा केला होता. आता हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये क्रमांक एकवर येते. कोमो रेशम इंडस्ट्रीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे जगभरातील लोक रेशम फेब्रिक डिझानन, प्रिटिंग या कला शिकायला येतात. रेशमसोबतच फर्निचर डिझायनिंग आणि मॅनिफॅक्चरिंगमध्येही हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे. व्हिला एर्बामध्ये जगप्रसिद्ध एग्झिबिशन सेंटरदेखील आहे.

  असा करा लेक कोमोचा प्रवास
  भारतातून इटलीच्या लेक कोमो येथे फ्लाइटने प्रवास करावा लागतो. फ्लाइट दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगलुरु या शहरांमधून जाते. ही फ्लाइट तुम्हाला इटलीच्या मिलान एअरपोर्टवर सोडते. तेथून लेक कोमो 85 किलोमीटर अंतरावर आहे. मिलानपासून कोमोपर्यंत ट्रेन किंवा रस्ता मार्गाने जाता येते. मुंबईपासून लेक कोमो 6 हजार किमी दूर आहे.

Trending