आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शनसाठी बेंगळुरूला रवाना झाले दीपवीर, सिंदूर नाही पण गळ्यात दिसले 20 लाखांचे मंगळसूत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवी नवरी दीपिका पती रणवीरबरोबर मंगळवारी एअरपोर्टवर स्पॉट झाली. हे नवदाम्पत्य रिसेप्शनसाठी बेंगळुरूला निघाले. त्यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन बुधवारी बेंगळुरूमध्ये होत आहे. खास फॅमिली आणि नातेवाईकांसाठी हे रिसेप्शन असणार आहे.

 

दीपवीरच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचे झाल्याचे दोघे पुन्हा एकदा व्हाइट आऊटफिटमध्ये झळकले. नवी नवरी दीपिका व्हाइट फ्रॉक स्टाइल सूट, ओढणी, हातात चुडा आणि मंगलसूत्र परिधान केले होते. तर रणवीर पांढरा कुर्ता-पायजमा, जुती आणि फ्लोवर प्रिंट नेहरू जॅकेट परिधान केले होते. यापूर्वीही लग्नासाठी जाताना आणि परतताना दोघे व्हाइट कलरच्या ड्रेसेसमध्ये झळकले होते. एअरपोर्टवर दोघे हातात हात घेऊन जाताना दिसले. दोघे आनंदात दिसत होते. पती रणवीरच्या कमेंटवर दीपिका खळखळून हसतानाही दिसली. बेंगळुरूच्या पार्टीनंतर 28 तारखेला मुंबईत मीडियापर्सन्ससाठी आणि 1 डिसेंबर ला बॉलिवूड फ्रेंड्ससाठी रिसेप्शन ऑर्गनाइज केले जाईल. दीपिका आणि रणवीरने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह केला. 


सासरे म्हणाले, दीपिका चांगली सून 
- दीपिकाचे सासरे म्हणजे रणवीरचे वडील जगजित भवनानी यांनी लग्नानंतर दीपिका त्यांची सर्वात चांगली सून बनणार असल्याचे संकेत दिले होते. 15 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरचे सिंधी पद्धतीने लग्न झाले तेव्हा जगजित भवनानी यांनी दीपिकाचे वेलकम खास पद्धतीने केले होते. 
- जगजित यांनी सुनेचे वेलकम करत म्हटले होते की, ये दिवानी तो भवनानी हो गई.. दिपिकाच्या, 'कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई' (बाजीराव मस्तानी) मधील गाण्यापासून ते इन्स्पायर होते. 
- दीपिकाचा नुकताच सासू म्हणजे रणवीर सिंहची आई अंजू भवनानीबरोबरचा फोटो समोर आला होता. त्यात दोघींची बाँडींग पाहायला मिळाली. सासूचा हात हाती घेतलेल्या त्यांच्या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. 
- या फोटोत रणवीरचे वडील जगजित भवनानी आणि बहीण रितिका भवनानीदेखिल होते. 


दीपिकापेक्षा फक्त 5 महिन्यांनी मोठा आहे रणवीर 
- रणवीर सिंह दीपिका पदुकोणपेक्षा फक्त 5 महिन्यांनी मोठा आहे. दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी कोपेनहेगेन (डेन्मार्क) मध्ये झाला होता. त्यामुळे 5 महिन्यांपूर्वी 6 जुलै 1985 ला रणवीर सिंहचा जन्म मुंबईत झाला होता. 
- रणवीर आणि दीपिकाने संजय लीला भंसाळी यांच्या 'गोलियों की रासलीला: राम-लीला' (2013) मध्ये काम केले होते. तेव्हाच त्यांचे अफेयर सुरू झाले होते. त्यानंतर ते 'फाइंडिंग फेनी' (2014), 'बाजीराव मस्तानी' (2016) आणि  'पद्मावत' (2018) मध्येही एकत्र झळकले. 


वादात अडकले लग्न 
- दीपिका-रणवीरचे लग्नही वादात अडकले होते. इटलीच्या शीख संघटनेचे म्हणणे आहे की, दोघांचे लग्न शीख पद्धतीने झाले नाही. भारतीय शीख समुदायाचे इटलीचे अध्यक्ष सुखदेव सिंह कांग म्हणाले की, अकाल तख्त हुकुमनाम्यानुसार गुरू ग्रंथ साहेब गुरुद्वाऱ्याच्या बाहेर नेता येत नाही. पण इटलीत दीपवीरच्या लग्नासाठी तसे करण्यात आले. 
- ते म्हणाले की, ते अकाल तख्तला याबाबत कारवाई करण्यासाठी लेटरही लिहितील, मीडिया रिपोर्ट्सनुसार अकाल तख्तचे विद्यमान जत्थेदार ज्ञानी हरप्रित सिंह म्ङणाले की, तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल. या लग्नासाठी सुवर्ण मंदिर, अमृतसरचे भाई नरेंद्र सिंग (हजुरी रागी) इटलीला गेले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...