आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone, Angered By A Comment From Ranveer Singh, Said 'You Will Not Get Dinner Tonight'

रणवीर सिंहच्या एका कमेंटमुळे भडकली दीपिका पदुकोण, म्हणाली - 'तुला आज रात्री जेवण मिळणार नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री दीपिका पदुकोणने अशातच आपल्या शाळेतील काही रिपोर्ट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या रिपोर्ट्समध्ये दीपिका पदुकोणच्या टीचरने तिच्या खूप तक्रारी केली आहेत. दीपिकाच्या एका रिपोर्टमध्ये लिहिले गेले आहे की, ती खूप बडबड करते. तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये लिहिले गेले होते की, तिला इंस्ट्रक्शन फॉलो करण्याची गरज आहे. दीपिका पदुकोणच्या या रिपोर्टवर अभिनेता आणि पती रणवीर सिंहनेदेखील मजेदार कमेंट केले.  रणवीर सिंहने दीपिकाच्या फोटोवर कमेंट करत लिहिले, "हो, टीचर मी तुमच्याशी सहमत आहे." पण रणवीरची कमेंट त्याला खूप महाग पडली.  

झाले असे की, रणवीर सिंहची कमेंट पाहून दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर कमेंट केले. दीपिकाने पती रणवीरला धमकी दिली. दीपिका पदुकोण म्हणाली, "तुला आज रात्री जेवण मिळणार नाही." दीपिकाच्या रिप्लायमुळे फॅन्सचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले. या कमेंटला कित्येक लाईक मिळाल्या.