आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापासून रिसेप्शनपर्यंत, भरजरी लहेंगा आणि ज्वेलरीत दिसली होती दीपिका, आता रणवीर सिंहच्या नववधूचा स्मोकी लूकमध्ये दिसला बोल्ड अवतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या 20 दिवसांपासून लग्न आणि रिसेप्शन पार्टीमुळे चर्चेत आहे. आता दीपिका पदुकोणचे एक बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतर नववधू दीपिका पहिल्यांदा बोल्ड अंदाजात दिसली आहे. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिका साडी, लहेंगा आणि हेवी ज्वेलरी लूकमध्ये दिसली होती. दीपिकाने हे बोल्ड फोटोशूट  GQ मॅगझिनसाठी केले आहे. या बोल्ड फोटोजमध्ये दीपिका ब्लू, ब्लॅक तर कधी व्हाइट कलरच्या कॉश्च्युममध्ये दिसतेय. त्यासोबत न्यूड मेकअपमध्ये तिचा स्मोकी लूक अतिशय बोल्ड दिसतोय. 


दीपिकाचा बोल्ड लूक बघून लोक करत आहेत ट्रोल....
लग्नानंतर दीपिकाचे हे पहिले फोटोशूट बघून लोक तिला ट्रोल करत आहेत. साई महेश नावाच्या एका यूजरने लिहिले, दीपिका कुपोषित दिसतेय. जीक्यू मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका रणवीरविषयी म्हणाली होती , "रणवीर मुल्यांना समजतो आणि तो अतिशय भावूक आणि हुशार आहे. खास गोष्ट म्हणजे तो कायम माझ्यासोबत लहान मुलांसारखा वागतो. त्याचे हेच गुण आहे आणि तो एक  रिअल पर्सन आहे."

 

14-15 नोव्हेंबर रोजी दीपिका-रणवीरचे झाले लग्न...
दीपवीरने 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या लेक कोमो येथे लग्न थाटले. या दोघांचे 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीने लग्न लागले. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी सिंधी पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर 21 डिसेंबर रोजी दोघांनी बंगळुरु येथे दीपिकाच्या नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवले होते. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ग्र्रॅण्ड हयात येथे दुसरे तर 1 डिसेंबर रोजी याच हॉटेलमध्ये या कपलचे तिसरे रिसेप्शन झाले. दीपिका-रणवीर यांचे सहा वर्षांपूर्वी 'गोलियों की रासलीला : रामलीला'च्या सेटवर सुत जुळले होते. त्यानंतर हे दोघे 'फाइंडिंग फॅनी', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांत एकत्र झळकले. 

बातम्या आणखी आहेत...