आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून 'छपाक'च्या शूटिंगनंतर दीपिका पदुकोणने सेटवरच जाळले प्रोस्थेटिक्स मेकअपचे तुकडे  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलीकडेच तिच्या आगामी 'छपाक' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. रणवीर सिंगसोबत लग्न झाल्यानंतरचा तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका सााकरली आहे. दीपिकाने शूटिंगच्या शेवटच्या दिवशी तिच्या भूमिकेसाठी वापरण्यात आलेले सर्व प्रोस्थेटिक्स मेकअप जाळून टाकले. याविषयी खुद्द दीपिकाने एका मुलाखतीत खुलासा केला.

म्हणून घेतला हा निर्णय...
‘छपाक’ या चित्रपटाची कथा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात दीपिका ही लक्ष्मीची भूमिका साकारत असून त्यासाठी तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला. खरं तर शूटिंग संपल्यानंतर कलाकार आठवण म्हणून भूमिकेशी संबंधित एखादी गोष्ट आपल्याकडे जपून ठेवत असतात. पण दीपिकाने सांगितल्यानुसार, या भूमिकेचा तिच्यावर इतका परिणाम झाला की शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ते प्रोस्थेटिक जाळले. ”शेवटच्या दिवशी मी जे प्रोस्थेटिक वापरले ते मला अक्षरश: जाळून टाकावे लागले. इतक्या खोलवर या भूमिकेचा माझ्यावर प्रभाव होता. याआधी मला असा अनुभव कधीच आला नव्हता. त्या भूमिकेद्वारे मी जे काही अनुभवले त्यातून बाहेर पडण्यासाठी तो एक मार्ग होता,” असे दीपिकाने सांगितले. 

ही आहे स्टारकास्ट
'छपाक'मध्ये दीपिकाच्या पात्राचे नाव मालती आहे. तिच्यासोबत अभिनेता विक्रांत मैसी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. विक्रांतच्या पात्राचे नाव अमोल आहे. मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करुन लिहिले, ''अमोल आणि मालती मी तुम्हाला कायम माझ्यासोबत ठेवेल.'' 

लग्नानंतरचा पहिला चित्रपट... 
2018 मध्ये रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध झालेल्या दीपिकाचा लग्नानंतरचा हा पहिला चित्रपट आहे. याशिवाय ती '83' या चित्रपटातही झळकणार आहे. 'छपाक' या चित्रपटाचे चित्रीकरण जून 2019 मध्ये पूर्ण झाले. तर जानेवारी 2020 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाची दिग्दर्शक आहे.

बातम्या आणखी आहेत...