Home | News | Deepika Padukone Choose Bengaluru Hotel Leela Palace for Her wedding Reception

बेंगलुरुच्या या 5 स्टार हॉटेलमध्ये होणार दीपिका-रणवीरचे रिसेप्शन, 21 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे हॉटेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:10 PM IST

दीपिकाने रिसेप्शनसाठी बेंगलुरुच्या 'द लीला' हॉटेलची निवड एका खास कारणासाठी केली आहे.

 • Deepika Padukone Choose Bengaluru Hotel Leela Palace for Her wedding Reception

  मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण 14-15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीसाठी दोघंही शुक्रवारी रात्रीच इटलीला रवाना झाले. रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर दीपिका-रणवीर बेंगलुरु आणि मुंबईमध्ये रिसेप्शन देणार आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या लीलाने (रामलीला फिल्म) रिसेप्शनसाठी बेंगलुरुचे 'द लीला पॅलेस' हॉटेलची निवड केली आहे.


  लीला हॉटेल निवडण्यामागे खास कारण
  दीपिकाने रिसेप्शनसाठी बेंगलुरुच्या 'द लीला' हॉटेलची निवड एका खास कारणासाठी केली आहे. कारण 'द लीला पॅलेस' बेंगलुरु हे न्यूयॉर्कच्या प्रसिध्द इटॅलियन रेस्तरॉ 'ले सर्क सिग्नेचर'ची फ्रेंचाइजी आहे. न्यूयॉर्कमधील ‘ले सर्क सिग्नेचर’ दीपिकाला पहिलेच जास्त आवडते. याच कारणांमुळे दीपिकाला याच हॉटेलमध्ये तिचे रिसेप्शन ठेवायचे आहे.


  रिपोर्ट्सनुसार, दीपिकाच्या आई उज्वला 2-3 वेळा येथे फूड टेस्टिंगसाठी गेल्या आहेत. रिसेप्शनच्या मेन्यूमध्ये विशेषतः साउथ इंडियन पकवान असतील. लग्नानंतर 18 नोव्हेंबरला इटलीमधून परतल्यानंतर 20 नोव्हेंबरला दीपिका-रणवीर बेंगलोर हॉटेलमध्ये चेक-इन करतील. दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फंक्शनची सुरुवात दीपिकाच्या घरी झालेल्या नंदी पूजेने झाली होती. यानंतर रणवीरच्या घरी हळदी सेरेमनी झाली होती.

  'द लीला पॅलेस'ची विशेषता
  बेंगलुरुमध्ये ओल्ड एयरपोर्ट रोडवरील 5 स्टार हॉटेल 'द लीला पॅलेस' 284 डीलक्स आणि रॉयल प्रीमियम रुम आहे. यासोबतच येथे 44 रॉयल क्लब रुम्स आहेत. यामध्ये डेडिकेटेड बटलर आणि रॉयल क्लब लाउंजची सुविधा आहे. रॉयल क्लब रुममध्ये प्रायव्हेट चेक-इनसोबतच पर्सनल बटलर, प्रायव्हेट डायनिंग, क्लब लाउंज विद सेपरेट सिगार रुम, शॅम्पेन रुम आणि बिलबोर्ड रुमच्या सुविधा उपलब्ध आहेत. यासोबतच येथे 29 सुइट्स आहेत. येथील वैंक्वट वेन्यू जवळपास 21 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. येथे व्हर्लपूल बाथ, सौना आणि स्टीम रुमसोबतच सूथिंग स्पा अँड फेशियलची सुविधाही उपलब्ध आहे.

 • Deepika Padukone Choose Bengaluru Hotel Leela Palace for Her wedding Reception
 • Deepika Padukone Choose Bengaluru Hotel Leela Palace for Her wedding Reception
 • Deepika Padukone Choose Bengaluru Hotel Leela Palace for Her wedding Reception
 • Deepika Padukone Choose Bengaluru Hotel Leela Palace for Her wedding Reception

Trending