आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deepika Padukone Did Om Shanti Om For Free, Now Take 10 Crore Per Movie

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Birthday Special:दीपिका पादुकोणने बॉलीवुडमध्ये एंट्री मिळण्यासाठी घेतली नव्हती कोणतीही फी, 11 वर्षांनंतर आज एका सिनेमाचे घेते 10 कोटी रूपये...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज 33 वा वाढदिवस आहे. 2007 मध्ये ओम शांति ओम चित्रपटातून तिने बॉलीवूडमधला प्रवास सुरू केला होता, तर आज ती बॉलीवूडवर राज करते. ती बॉलीवूडमधली सगळ्यात जास्त फी घेणारी अॅक्ट्रेस आहे आणि देशातील सगळ्यात श्रीमंतर अॅक्टर्सच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तिचे सिनेमे कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडतात. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला तिच्या 11 वर्षांच्या बॉलीवूड प्रावासाबद्दल सांगणार आहोत की, कसे तिने स्वत:ला बॉलीवूडची राणा बनवले.


पहिल्या सिनेमासाठी घेतली नाही कोणतीही फी 
2007 मध्ये दिपीकाने फराह खानच्या 'ओम शांति ओम' मधून शाहरूख सोबत डेब्यू केला होता. या सिनेमासाठी तिने एकही रूपया फी घेतली नव्हती, आणि तिला वाटले की, हा सिनेमा चांगली कामगिरी करेल आणि तसेच झाले. तिच्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये तिने स्वत:ला त्या स्थानावर नेऊन ठेवले आहे की आता ती एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रूपये घेते.

 
फोर्ब्सच्या यादीत एकटी अभिनेत्री
2018 च्या फोर्ब्सच्या श्रीमंत अॅक्टर्सच्या यादीत फक्त एक दिपीकाच एकुलती एक अभिनेत्री आहे. तिने अमिताभ बच्चन, महेंद्र सिंह धोनी, आमिर खान आणि आणि नवरा रणवीर सिंगलाही मागे टाकत चौथ्या नंबरपर्यंत मजल मारली आहे.


एका सिनेमासाठी घेते 10 ते 12 कोटी
मीडिया रिपोर्ट्सनुसार ती एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रूपये घेते आणि तिचा अभिनय कौश्यल्य आणि सिनेमांची कमाई पाहीली तर तेवढी फी घेण बरोबरही आहे. तिच्या 7 सिनेमांनी 100 कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. 


ब्रँड एंडोर्समेंटसाठी घेते 6 ते 8 कोटी रूपये
GQ मॅगजीननुसार दीपिका जाहिरातींसाठी एका ब्रँडकडून 6 ते 8 कोटी रूपये घेते. ती Nike, Coco-Cola, Oppo, Axis Bank, L’Oreal Paris, Royale Atmos, Tanishq, Goibibo, Vistara सोबतच इतर ब्रँड्सची अँबेसीडर आहे.