आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'चा हा एक्स कंटेस्टेंट होता दीपिकाचा पहिला बॉयफ्रेंड? एकत्र केले होते करिअरचे सर्वात बोल्ड फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाची तारीख ठरली आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 ला त्यांच्या लग्नाच्या विधी होणार आहेत. रणवीरपुर्वी दीपिकाचे नाव रणबीर कपूर, सिध्दार्थ माल्या, युवराज सिंह आणि निहार पांड्यासोबत जोडले गेले आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती असेल की, 'बिग बॉस 8' मध्ये कन्टेस्टेंट म्हणून दिसलेला मॉडल उपेन पटेलसोबतही दीपिकाचे नाव जोडले गेले होते. 


व्हायरल झाला होता उपेनसोबतचे बोल्ड फोटोशूट 
- 2014 मध्ये उपेन पटेल 'बिग बॉस'च्या घरात कन्टेस्टेंट म्हणून दिसला होता. तेव्हा त्याचे आणि दीपिकाचे एक फोटोशूट खुप व्हायरल झाले होते. हे दीपिकाचे सर्वात बोल्ड फोटोशूट आहे असे म्हटले जाऊ शकते. या फोटोमध्ये दीपिका आणि उपेनची इंटीमेसी पाहायला मिळतेय. फोटोशूट दीपिकाच्या मॉडलिंग डेजमधील होते. दोघं त्या काळात एकमेकांना डेट करत असल्याचेही बोलले जात होते. 

 

दोन वेळा उपेनसोबत झाले होते ब्रेकअप
- उपेन त्या काळात लॉन्गटर्म रिलेशनशीपविषयी सीरियस नव्हता आणि दीपिकासोबतच दूस-या मुलींनाही डेट करत होता. यामुळे त्याचे दीपिकासोबत ब्रेकअप झाले. दीपिका बेंगलुरुमधून मुंबईत आली आणि अनुपम खेरच्या अॅक्टिंग अकॅडमीमध्ये एडमिशन घेतले. तिची भेट निहार पंड्यासोबत झाली. दोघं एकमेकांवर प्रेम करत होते. या दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका उपेनसोबत बोलायची असे बोलले जाते. तेव्हा उपेन शमिता सिंघा(दुसरी गर्लफ्रेंड) पासून वेगळा झाला. यानंतर दीपिका आणि तो पुन्हा जवळ आले. परंतु दुस-या वेळीही त्यांचे नाते टिकू शकले नाही. 


फोटोशूटविषयी दीपिकाने दिले होते स्पष्टीकरण 
- अक्टोबर 2014 मध्ये एका इंग्रजी वेबसाइटसोबत बोलताना दीपिकाने आपल्या बोल्ड फोटोशूटविषयी स्पष्टीकरण दिले होते. ती म्हणाली होती की, "हो मी फोटोशूट केले होते, यामध्ये लपवण्यासारखे काहीच नाही. आम्ही वेन्डेल रोड्रिक्स(फॅशन डिझाइनर) साठी एक फॅशन वीक स्पेशलमध्ये हे शूट केले होते. तेव्हा सर्वांनी हे फोटोज पाहिले होते." दीपिकाने एका मुलाखतीत म्हटले होते की, मीडिया काय म्हणते याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. दीपिका म्हणाली होती की, "मी एका चांगल्या कुटूंबातून आहे. माझ्या पालकांनी मला चांगले संस्कार दिले आहेत. यामुळे मीडियाला जो बोलायचे आहे ते बोलू द्यावे." तिच्या या स्टेटमेंटनंतर तिचे आणि उपेल पटेलचे नाते मैत्रीपेक्षा जास्त होते असे मानले जाते. 

बातम्या आणखी आहेत...