आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणने मिटवला रणबीर कपूरच्या नावाचा RK टॅटू, नवरा रणवीरसोबत पोज देताना मानेवरुन टॅटू होता गायब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या रिलेशनशिपविषयी सर्वांना माहिती आहे. या अफेअर दरम्यान दीपिकाने रणबीरच्या नावाचा RK टॅटू मानेवर गोंदवला होता. आता दीपिकाचे रणवीर सिंहसोबत लग्न झाले आहे. तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये दीपिकाची मान क्लीन दिसतेय. दीपिकाचा हा व्हिडिओ नव-यासोबत रिसेप्शनसाठी बेंगळुरुला जातानाचा आहे. यामध्ये दीपिकाच्या मानेवर RK चा टॅटू दिसत नाहीतेय. अशा वेळी दीपिकाने लग्नानंतर एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू काढून टाकला असे बोलले जातेय. व्हिडिओ पाहून चाहत्यांचे रिअॅक्शन येणे सुरु झाले आहे. एका यूजरने लिहिले, "अजून कुणी आहे का, ज्यांना दीपिकाचा आरके टॅटू दिसला नाही" एका यूजरने लिहिले "तिने आपला टॅटू झाकला आहे का" 

 

आता रणबीरची चांगली मैत्रिण आहे दीपिका...
- ब्रेकअपनंतर दीपिका आणि रणबीर खुप जवळचे मित्र आहेत. दोघांची स्पेशल बॉन्डिंग नेहमीच इव्हेंट्समध्ये दिसत असते.
- लग्नापुर्वी दीपिका 'कॉफी विद करण'मध्ये रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भटसोबत दिसली होती. या दरम्यान आलिया-दीपिकाने सांगितले होते की, दोघीही पार्टनरसोबत एकत्र हॉलिडेवर जाण्याचा प्लान करणार आहेत.
- सध्या तरी दीपिका आणि रणवीर रिसेप्शनच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. अशा वेळी येणा-या काळात आलिया आणि रणबीरसोबत हे नवविवाहित दाम्पत्य हॉलिडेवर जाऊ शकतात. 


ब्रेकअपनंतर दीपिकाने केले रणबीरसोबत काम 
- कतरिना कैफ, रणबीरच्या आयुष्यात आली आणि दीपिकासोबत त्याचे ब्रेकअप झाले. तरीही दीपिकाने RK टॅटू मानेवरुन मिटवला नव्हता.
- दीपिकाने आपले पर्सनल नाते कामाच्या मध्ये येऊ दिले नाही. ब्रेकअपनंतर या दोघांनी 'ये जवानी है दिवानी' आणि 'तमाशा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...