आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे 3 कोटींची डायमंड रिंग, सोन्याने मढवलेली ओढणी, 4 कोटींच्या बोटीतून आले व-हाडी, इटॅलियन लोक बोलत होते हिंदी - असा होता दीपवीरच्या लग्नाचा थाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. दोन पद्धतीने त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर रणवीरची नववधू असलेल्या दीपिका पदुकोणचा तिसरा फोटो समोर आला आहे. या फोटोत दीपिका अतिशय साध्या लूकमध्ये दिसत असून तिने गोल्डन बॉर्डर असलेली रेड साडी परिधान केली आहे. पण तिच्या भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र दिसले नाही. तिने कानात फक्त हेवी इअररिंग्स घातले होती. फोटोत तिच्यासोबत दोन महिला दिसत आहेत.

 

आनंद कारजनंतर होस्ट करण्यात आली लॅव्हिश पार्टी...
सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर मिस्टर अँड मिसेस भवनानी अर्थातच रणवीर आणि दीपिका यांनी पाहुण्यांसाठी एक लॅव्हिश पार्टी होस्ट केली होती. या पार्टीत पाहुण्यांना 50 स्पेशल कॉकटेल सर्व्ह करण्यात आले.

 

कोट्यवधींची आहे साखरपुड्याची अंगठी...
दीपिकाने साखरपुड्याला घातलेल्या डायमंड रिंगची किंमत तब्बल 2.7 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही सिंगल सोलिटेअर स्व्केअर डायमंड रिंग आहे.

 

सोन्याच्या तारा असलेली खास ओढणी...
सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात दीपिकाने लहेग्यांसोबत जी लाल ओढणी घेतली होती, त्यावर सोन्याच्या तारांनी वर्क करण्यात आले होते. त्यावर संस्कृतमध्ये सदा सौभाग्यवती भव: असे लिहिले होते. सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नसाठी खास अमृतसरहून पुजारी इटलीत आले होते. इतकेच नाही तर आनंद कारजसाठी  Villa Del Balbianello मध्ये एक गुरुद्वारा बनवण्यात आला होता. 

 

1.73 कोटींमध्ये बुक आहे रिसॉर्ट...
दीपवीरचे लग्न इटलीतील लेक कोमो येथे झाले. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि दीपिका लेक कोमोच्या ईस्टमध्ये स्थित असलेल्या ब्लेविओ गावातील एका लग्झरी रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. येथे हे दोघे त्यांच्या कुटुंबीयांसोबत 17 नोव्हेंबरपर्यंत वास्तव्य करतील. या रिसॉर्टमध्ये थांबण्यासाठी त्यांनी सुमारे 1.73 कोटी रुपये खर्च केले आहेत.


4 कोटींची बोट..
न्यूली मॅरिड कपल दीपिका आणि रणवीर यांनी इटलीत एक रॉयल विंटेज बोट भाड्याने घेतली आहे. यासाठी त्यांनी तब्बल 4 कोटी रुपये खर्च केले आहेत. यातूनच व-हाडी लग्नस्थळी पोहोचले होते. 18 नोव्हेंबर रोजी रणवीर आणि दीपिका बंगळुरु येथे परतणार असून 21 नोव्हेंबर रोजी येथे वेडिंग रिसेप्शन आहे. यानंतर 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत दुसरे रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड सेलेब्स सहभागी होणार आहेत.


हिंदीत बोलत होते इटॅलिनय लोक...
दीपिकाच्या लग्नात रिसॉर्टमधील इटॅलियन स्टार हिंदी आणि कोकणी भाषेत बोलत होता. रिपोर्टनुसार, स्टाफला खास हिंदी आणि कोकणी भाषेचे ट्रेनिंग देण्यात आले होते, जेणेकरुन ते पाहुण्यांसोबत सहज संवाद साधू शकतील. इतकेच नाही तर इटॅलियन स्टाफला इंडियन डिशेजची माहिती देण्यासाठीही ट्रेनिंग देण्यात आले होते.    

बातम्या आणखी आहेत...