आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शाही विवाह सोहळ्लयानंतर दीपवीर इटलीहून मुंबईला परतले. लग्नानंतर दीपिका पहिल्या दिवशी रणवीरच्या घरी सासरी राहीली. पण दुसऱ्या दिवशी सोमवारी 'दीपवीर' अपार्टमेंटमध्ये गेले. सुत्रांच्या मते, मुंबईतील प्रभादेवी अपार्टमेंटमध्येच ते राहतील. रणवीर-दीपिका यांनी जुहूमध्ये 50 कोटींचा बंगला खरेदी केला आहे. पण अद्याप त्याचे इंटेरियरचे काम सुरू आहे. त्यामुळे ते प्रभादेवी येथेच राहणार आहेत.
रविवारी दीपिका सासरी पोहचली तेव्हा संपूर्ण भवनानी कुटुंबाने दोघांचे स्वागत केले. त्यांनी खास मुहूर्तावर दीपवीरची ओवाळणी करुन सिंधी प्रथेनुसार शुभमुहूर्तावर घरी पुजा ठेवली. दोन दिवसांपूर्वी दीपवीर आणि त्यांच्या कुटूंबियांचा एक फोटो शेअर झाला होता. फोटोत दीपिका आणि सासूबाईंचा हात हातात धरलेला आहे. त्दोयावरून दोघींमध्ये बाँडिंग असल्याचे दिसत आहे.
काय आहे आनंद कारज ?
आनंद कारजची प्रथा गुरुद्वारामध्ये पार पडते. ही प्रथा दिवसा होत असते. यात नवरदेव-नवरी गुरूद्वारात गुरू ग्रंथसाहीबसमोर बसतात. तिथे नवरी नवरदेवाच्या डाव्या बाजूला बसून त्यानंतर दोघे गुरू ग्रंथसाहीब ग्रंथाला प्रदक्षिणा घालतात.
21 नोव्हेंबरला पहिले रिसेप्शन
इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर दीपवीर यांनी 21 नोव्हेंबरला बंगळुरूत कुटुंबीय आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवले आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मीडियातील लोकांसाठी आणि 1 डिसेंबरला बॉलीवूडकरांसाठी रिसेप्शन असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.