आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेनमेंट डेस्क- दीपिका पादुकोण(Deepika Padukone) 33 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 5 जानेवारीला झाला होता. अनेक सुपरहीट सिनेमात काम करण्याच दीपिकाला आपल्या हॅंडबॅगवर खुप प्रेम आहे. काहि दिवसांपूर्वी दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये दीपिकाने सांगितले की, तिला तिच्या बॅगमध्ये काय-काय ठेवणे आवडते. तिने सांगितले की, नवरा रणवीर सिंगलाही पर्समध्ये ठेवून फिरण्याची तिची इच्छा आहे. ट्रॅव्हलींगची आहे आवड...
- दीपिकाने पिंकविलाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की,- 'जेव्हा पण ट्रॅव्हल करते तेव्हा सोबत एक बॅग ठेवते. यांत मी माझ्या वापरातले सगळ्या गोष्टी ठेवते जसे हेअर ड्रायर, पैसे, मेकअप कीट, माउथ फ्रेशनर इत्यादी. बॅगमध्ये कोणत्या तीन व्यक्तींना ठेवायची इच्छा आहे या प्रश्नावर तिने मदेशीर उत्तर दिले. ती म्हणली की, तिला तिच्या बॅगमध्ये रणवीर आई उज्जवला आणि बहिण अनीशाला ठेवायला आवडेल.
फॅन्सला दिले खास गिफ्ट
दीपिकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी फॅन्सला एक गिफ्ट दिले आहे. तिने शनिवारी संध्याकाळी 4 वाजता आपली वेबसाइट लॉन्च केली. त्यात ती आयुष्यातील खास गोष्टी शेअर करणार आहे. त्यासोबत येणारे सगळे इव्हेंट्स, फोटोशूट आणि अॅडबद्दलची सगळी माहिती त्यात देणार आहे.
11 वर्षांचे अॅक्टींग करिअर
11 वर्षांच्या करिअरमध्ये तिने 24 सिनेमात काम केले आहे. तिने 2007 मध्ये 'ओम शांति ओम' मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर तिने 'बचना-ए-हसीनों', 'हाउसफुल', 'कॉकटेल', 'रेस 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हैप्पी न्यू ईयर', 'पीकू', 'तमाशा', 'बाजीराव मस्तानी' सारख्या चित्रपटात काम केले आहे. दीपिका लवकरच मेघना गुलजारचा सिनेमा 'छपाक'ची शूटिंग सुरू करेल. दिपिकाला हायेस्ट पेड अॅक्ट्रेस बोलले जाते, तिने 'पद्मावत'साठी 11 कोटी रूपये घेतले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.