आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या या होणा-या नंदेसोबत दीपिकाचे अजिबात पटत नाही, अनेक वर्षांपासून दोघींमध्ये आहे भांडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या कपलने सोशल मीडियावर कार्ड शेअर करुन ही माहिती दिली. 14 आणि 15 नोव्हेंबरला त्यांचे लग्न होणार आहे. या लग्नानंतर दीपिकाचे अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत नाते जोडले जाईल. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, दीपिकाचे तिच्या एका होणा-या नंदेसोबत अजिबात पटत नाही. दोघांमधील भांडण हे नवीन नाही, त्यांचे भांडण 11 वर्षे जुने आहे. 


कोण आहे दीपिकाची नणंद 
सोनम ही नात्याने रणवीर सिंहची कजिन आहे. सोनमची आई सुनीता कपूर आणि रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी कजिन आहेत. पण सोनम आणि दीपिका यांच्यामधील नाते सुरुवातीपासून चांगले नाही. दोघींमधील भांडणाला 2007 मध्ये सुरुवात झाली. दोघींनी बॉलिवूडमध्ये एकाच वर्षी डेब्यू केला होता. सोनम कपूरने संजय लीला भन्साळीचा चित्रपट 'सांवरिया' मधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती, तर दीपिका पदुकोण पहिल्यांदा 'ओम शांति ओम'मध्ये दिसली होती. दोघींचे चित्रपट 9 नोव्हेंबर 2007 रोजी रिलीज झाले होते. या चित्रपटांच्या टक्करमुळे दोघींमध्ये वाद आहे. 

 

दीपिकापुर्वी सोनमला डेट करायचा रणबीर कपूर 
- 'सांवरिया' चित्रपटावेळी रणबीर कपूर आणि सोनम कपूरच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. परंतु लवकरच रणबीर आणि दीपिकाच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या. यामुळे दीपिका आणि सोनमच्या नात्यात कटूपणा आला. परंतु 2009 मध्ये कतरिना कैफसाठी रणबीरने दीपिकाला धोका दिला. यानंतर रणबीरच्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंड्स सोनम आणि दीपिकाची मैत्री झाली. 

 

जास्त दिवस टिकली नाही मैत्री
दीपिका पीआर एजेन्सीच्या माध्यमातून सोनमच्या विरोधात स्टोरी बनवत आहे असे सोनमला कळाले. यानंतर दोघींच्या मैत्रीत दुरावा आला. त्यावेळी दोघींची पीआर एजेंसी एकच होती. अनेक रिपोर्ट्समध्ये छापण्यात आले होते की, दीपिकाने रिजेक्ट केलेले चित्रपट सोनमला मिळत आहेत. यानंतर सोनमने ती पीआर एजेंसी सोडली. 

 

...आणि करण जोहरच्या शोमध्ये सोनमने साधला दीपिकावर निशाना 
2010 मध्ये दीपिका आणि सोनम 'कॉफी विद करण'मध्ये एकत्र पोहोचले होते. परंतु येथे त्यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला. करण जोहरने सोनमला विचारले की, अशी कोणती गुड गर्ल आहे, जी आता वाईट बनली आहे? उत्तर देताना सोनमने दीपिकाचे नाव घेतले होते. यानंतर करणने सोनमला विचारले की, दीपिकाला काय सल्ला देशील? यावर सोनम म्हणाली होती की,"आपली स्टाइल स्वतः बनवा. कतरिनाची आपली स्टाइल आहे, ती स्वतःला दुस-यांच्या साच्यात फिट करण्याचा प्रयत्न करत नाही. यामुळे मी तिचा सन्मान करते."

 

सोनमने डिलीट केला होता दीपिकाच्या पॅडमॅन चॅलेन्जचा व्हिडिओ 
फेब्रुवारी 2018 मध्ये अक्षय कुमार आणि सोनम कपूरचा चित्रपट 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'पॅडमॅन चॅलेंज' कँपेन सुरु होते, तेव्हा ते दीपिका पदुकोणनेही अॅक्सेप्ट केले होते. परंतु सोनमने तिचा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ डिलीट केला होता असे बोलले जाते. मे महिन्यात सोनमने आनंद आहूजासोबत लग्न केले, तेव्हा दीपिका लग्नाला पोहोचली नव्हती. तेव्हापासून अंदाज लावले जातत की, सोनम आणि दीपिका यांच्या नात्यात अजुनही दरी आहे. परंतु त्या काळात दीपिका कान फेस्टिव्हलमध्ये होती. यानंतर तिने लग्नात पोहोचता न आल्याने सोनमचे वडील अनिल कपूरची माफी मागितली होती. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...