आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या रोहित राऊतने दीपिका पदुकोणसाठी आणली पुरणपोळी, दीपिका म्हणाली- मी पुरणपोळीचा आस्वाद घेत गाणे ऐकत होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अगदी पहिल्या एपिसोडपासूनच ‘इंडियन आयडॉल सीझन 11’ चर्चेत आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाची घोडदौड चालूच राहिली, याचे सगळे श्रेय अतुलनीय प्रतिभा असणार्‍या प्रतिभावंत स्पर्धकांच्या तुकडीला जाते. तसेच, नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियासारख्या परीक्षकांच्या न्यायनिवाड्याने या गुणी स्पर्धकांना त्यांची उत्तम प्रतिभा सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या आठवड्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण इंडियन आयडॉलच्या मंचावर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हा एपिसोड खूप खास आहे. आगामी 'छपाक' या तिच्या बहुचर्चित चित्रपटाचे प्रमोशन करताना ती दिसणार आहे.
 

या सीझनमध्ये सर्वोत्कृष्ट सादरकर्त्यांपैकी एक असणार्‍या मराठमोळ्या रोहित राऊतने 'बद्तमीज दिल', 'बेइन्तेहाँ' आणि तिच्या 'छपाक' या आगामी चित्रपटातील 'नोक झोक' या काही गाण्यांवर सुरेल सादरीकरण केले आणि ते कमी म्हणून की काय दीपिकाला चकित करण्यासाठी त्याने सेटवर खास पुरणपोळी आणली. या सगळ्याने मंत्रमुग्ध होऊन दीपिका म्हणते, "मी पुरणपोळीचा आस्वाद घेत गाणे ऐकत होते, त्यासोबतच नाचत होते आणि अशा क्षणाचा आनंद लुटण्यापेक्षा एखाद्याला आयुष्यात काय हवे असते. मला असे वाटते की अशा सादरीकरणाचे मूल्यांकन करणे योग्य नाही, त्यामुळे या सर्जनशीलतेला तसेच त्याच्या हावभावांना मी पैकीच्या पैकी गुण देऊन हे या संध्येचे लय भारी सादरीकरण होते असे म्हणेन.'    

या एपिसोडसाठी दीपिकाने सब्यसाचीच्या कलेक्शनमधील साडीची निवड केली. सब्यसाची यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दीपिकाच्या या लूकचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.