आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : दीपिका पदुकोण 33 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी 1986 ला कोपेनहेगेन, डेनमार्कमध्ये दीपिकाचा जन्म झाला. दीपिका आणि रणवीर सिंगने डिसेंबर 2018 म्हणजेच मागच्या महिन्यातच लग्न केले आहे. दीपिका पदुकोण तिच्या विवाहानंतर पहिल्यांदाच निकलोडियन किड्स चॉईस अवॉर्डसच्या माध्यमातून लोकांसमोर आली. लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेली सौंदर्यवती तिच्या गालावरील खळीसह अधिकच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक कार्तिक आर्यनला सोपवले गेले होते. तो सर्वांना हसवत होताच त्यात दीपिकाही तिथे असल्यामुळे त्याने तिचीही चेष्टा करायला सुरुवात केली. त्याने सर्वांसमोर अगदी खुल्या मनाने तिची मस्करी केली.
डोमच्या आतील सुत्रांच्या मते दीपिकाचा विवाह झाल्याने कार्तिकला दु:ख झाले आणि त्याला नाईलाजाने तिला 'वाहिनी' म्हणून हाक मारावी लागली. एका सेगमेंटदरम्यान कार्तिक आर्यन म्हणाला, ''तू माझी असतीस, जर तू रणवीर भैयाची नसतीस, आता तर तुला दीपिका वाहिनी म्हणावे लागेल'' यानंतर कार्तिकने दीपिकाला एक लोकप्रिय कविता म्हणायला सांगितली, ती म्हणजे ''मछली जल की रानी है''.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.