आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरने गुडघ्यावर बसून केले दीपिकाला प्रपोज, रिंग घातल्यानंतर रणवीरने दिलेल्या स्पीचनंतर भावूक झाली दीपिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल दिवस अखेर आला आहे. आज दोघांचे लग्न होणार आहे. यापुर्वी काल मेंदी, साखरपुडा आणि संगीत सेरेमनीचा कार्यक्रम झाला. हे सर्व फंक्शन इटलीच्या लेक कोमो येथे होत आहेत. येथील सिक्योरिटी खुप टाइट आहे. पाहुण्यांच्या मोबाइल कॅमेराला स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. वेन्यूवरीन अजूनपर्यंत कोणताही फोटो आलेला नाही. पण फंक्शनची काही आवश्यक माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार साखरपुडा आणि संगीतमध्ये रणवीरने आपली स्टाइल सोडली नाही. त्याने गुडघ्यावर बसून दीपिकाला प्रपोज केले. तिच्यासाठी तूने मारी एंट्रियां गाणे गायले आणि एक स्पीच दिले. रणवीरचे स्पीच ऐकूण दीपिका इमोशनल झाली. आपल्या होणा-या पत्नीला इमोशनल झालेले पाहून त्याने तिला मिठी मारली.

 

साखरपुड्यानंतर डीनर 
- रात्री संगीत सेरेमनी झाली. यामध्ये दीपिकाने पांढरे तर रणवीरने ब्लॅक कलरचे आउटफिट घातले होते. सेरेमनीमध्ये बॉलिवूड सिंगर हर्षदीप कौरने एकापेक्षा एक गाणे गायली. त्याने आपले हिट गाणे म्हणजेच कबीरा, दिलबरो, मनमर्जिया हे सादर केले. या निमित्ताने क्लासिकल सिंगर शुभा मुदगलनेही ठुमरी प्रस्तुत केली. या गाण्यांवर सेरेमनीमधील एकुण 40 गेस्टने तुफान डान्स केला. वृत्तांनुसार सेरेमनीमध्ये रणवीर खुप एक्सायटडेड दिसला. त्याने ढोल वाजवला आणि आपल्या लेडी लव्हसाठी गाणेही गायले. सेरेमनीमध्ये गेस्टने 'मेहंदी नी मेहंदी..', 'काला शाह काला..', 'मेहंदी है रचने वाली..' सारख्या गाण्यांवर डान्स केला.

 

दीपिका-रणवीरने स्वतः केले पाहुण्यांचे स्वागत
संगीत-मेंदी आणि एंगेजमेंट सेरेमनीचे आयोजन कास्टा डिवा रिसॉर्टमध्ये करण्यात आले. सेरेमनीमध्ये सहभागी होणा-या पाहुण्यांना दीपवीरने गेटवर उभे राहून स्वतः वेलकम केले. दोघांनी येणा-या पाहुण्यांना स्वतःच्या हाताने वेलकम नोटही दिली.
- दीपवीरच्या लग्नात बॉलिवूडमधून शाहरुख खान, फराह खान आणि संजयलीला भन्साळी वेन्यूवर पोहोचले आहेत. प्रोड्यूसर आदित्य चोप्राही लग्नात सामिल होऊ शकतात असे बोलले जातेय.


कोंकणी पध्दतीने होणार लग्न 
दीपवीरचे लग्न कोंकणी पध्दतीने बुधवारी होईल. या निमित्ताने येथे दीपिका व्हाइट आणि गोल्डन कलरची साडी नेसणार आहे तर रणवीरही व्हाइट आउटफिटमध्ये दिसला. दोघांचे ड्रेसेस डिझायनर सब्यासाची व्दारे डिझाइन केले आहेत. गुरुवारी म्हणजेच 15 नोव्हेंबरला दोघांचे सिंधी पध्दतीने लग्न होईल.
- लग्नात सहभागी होणारे सर्व पाहुण्यांना फोटो क्लिक न करण्याची अपील करण्यात आली आहे. यासोबतच वेडिंग वेन्यूवर टाइट सिक्येरिटीची व्यवस्था करणयात आली आहे.
- लग्नात सहभागी झालेली सिंगर हर्षदीप कौरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तो लेक कोमोच्या किना-यावर हसबंडसोबत दिसतेय. तर लग्नासंबंधीत एक फोटो समोर आला आहे. यामध्ये वेडिंग वेन्यूवर काही गेस्ट दिसत आहेत.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...