आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Birthday : मागच्या बर्थडेला दीपिकाकडे 5 लग्जरी कार होत्या, पण यावेळी मात्र संख्या वाढून झाल्या आहेत 13

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दीपिका पदुकोणने नुकताच आपला 33 वा बर्थडे सेलिब्रेट केला. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दीपिकाने नोव्हेंबर 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केले. पती-पत्नी दोघांनाही लग्जरी आयुष्य आवडते. तसे तर दीपिकाकडे आधीपासूनच चांगले कार कलेक्शन आणि बंगले आहेत. पण रणवीरसोबत झाल्यानंतर तिच्या कार कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नाही जर बंगल्यांविषयी बोलायचे झाले तर आता 2 दोन नाही आणखी 4 बंगल्यांची ती मालकिन झाली आहे. 

 

सुमारे 141 कोटी रुपये आहे या बंगल्यांची किंमत...
रणवीरसोबत लग्न होण्याआधी दीपिकाकडे घरे होती. तिचे वांद्रा, मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. हा फ्लॅट तिने भाड्याने दिला आहे. प्रत्येक महिन्याला तिला 2 लाख रुपये भाडे मिळते. याव्यतिरिक्त प्रभादेवीमध्येहि तिचे एक फ्लॅट आहे. ज्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे. लग्नानंतर दीपिकाने रणवीरसोबत मिळून 50 कोटींचा एक बंगला खरेदी केला आहे. तिचा पती रणवीरकडेही गोवामध्ये एक बंगला आहे, ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त गोरेगांव, मुंबईमध्ये तिचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत 10 कोटी रुपये आहे.  प्रभादेवी, मुंबईमध्ये सी-फेसिंग एक आणि फ्लॅट आहे, ज्याला त्याने 15 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अव्हर ऑल दोघांकडे आता सुमारे 141 कोटी रुपयांचे बंगले आहेत. 

 

वाढले दीपिकाचे कार कलेक्शन... 

- दीपिकाकडे अनेक लग्जरी कार आहेत. तिच्याकडे मर्सिडीज Maybach S500 (1.67 कोटी रुपये), ऑडी ए 8 (1.56 कोटी रुपये), ऑडी क्यू 7 (93.35 लाख रुपये), बीएमडब्ल्यू 5 सीरिज (64 लाख रुपये), मिनी कूपर Cabriolet(36.1 लाख रुपये) कार आहेत. पन आता तिच्या कलेक्शनमध्ये आणखी काही कारचा समावेश झाला आहे. 

 

- पती रणवीरकडे Aston Martin Rapide (3.29 कोटी रुपये), लैंड रोवर रेंज रोवर वोग (2.05 कोटी रुपये), जगुआर एक्सजेएल (1.07 कोटी रुपये), टोयेटा लैंड क्रूज परडो (1.04 कोटी रुपये), मर्सिडीज बेंच जीलेएस (83 लाख रुपये), मर्सिडीज बेंच ई क्लास (70 लाख रुपये), ऑडी क्यू 5 (59.78 लाख रुपये), Maruti Ciaz (10.97 लाख रुपये) कार आहेत. याव्यतिरिक्त रणवीरकडे एक विंटेज मोटर सायकल आहे, ज्याची किंमत 6.8 लाख रुपये आहे. 

 

लाखोंचे ब्रँडेड बॅग्स...  
दीपिका हॅन्ड बॅग्ससाठी खूप क्रेझी आहे. तिच्याकडे अनेक ब्रांड्सच्या हॅन्ड बॅग्स आहेत. दीपिकाकडे Fendi Dotcom Studded Satchel ब्रांडच्या बॅग्स आहेत. या ब्रांडच्या एका बॅगची किंमत 2.52 लाख रुपये आहे. तिच्याकडे Chanel Boy Flap बगसुद्धा आहे, ज्याची किंमत 3.48 लाख रुपये आहे. तिच्याकडे गुची साइलिव (2.26 लाख रुपये) सीलाइन फैंटम (1.45 लाख रुपये), Gucci Dionysus (2.26 लाख रुपये), सेंट लॉरेंन (2.32 लाख रुपये), हर्मंस बर्किन (8 लाख रुपये) सारख्या इतर ब्रांड्सच्या हॅन्ड बॅग्सदेखील आहेत. 

 

टिसॉट क्लासिक प्रिंस डायमंड वॉच
दीपिकाकडे टिसॉट क्लासिक प्रिंस डायमंड वॉच आहे. यामध्ये 18 कॅरेट रोड गोल्ड डायमंड लागलेले आहेत. याची किंमत 8 लाख रुपये आहे. 

 

11 वर्षांच्या करियरमध्ये 24 चित्रपट... 
दीपिकाने आपल्या 11 वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये 24 चित्रपटात काम केले आहे. तिने 2007 मध्ये फिल्म 'ओम शांति ओम' ने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिने 'बचना-ए-हसीनों', 'हाउसफुल', 'कॉकटेल', 'रेस 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हैप्पी न्यू ईयर', 'पीकू', 'तमाशा', 'बाजीराव मस्तानी' सारख्या चित्रपटात काम केले आहे. दीपिका लवकरच मेघना गुलजारचा चित्रपट 'छपाक' ची शूटिंग सुरु करणार आहे. 

 

बॉलिवूडची हाइएस्ट पेड अक्ट्रेस... 
दीपिकाची गणती बॉलिवूडच्या हाइएस्ट पेड अक्ट्रेसेसमध्ये केली जाते. 'पद्मावत' साठी तिला 11 कोटी रुपये फीस मिळाली होती. तिची नेटवर्थ 102 कोटी रुप्ये आहे. तसेच तिचा पती रणवीरची नेटवर्थ 136 कोटी रुपये आहे.