आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्यापेक्षा कमी फीस मिळत असल्यामुळे दीपिका पदुकोणने सोडली होती फिल्म, स्वतः केला खुलासा, म्हणाली, 'ते चुकीचे होते'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोणचे म्हणणे आहे की, एकदा जेव्हा तिला अॅक्टरपेक्षा कमी फीस मिळत होती तेव्हा तिने ती फिल्म सोडली होती. झाले असे की, दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अभिनेता आणि अभिनेत्रींच्या फिसमधल्या फरकाबाबत बोलत आहे. हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या एका बुक लॉन्च इवेंटचा आहे.  

 

दीपिका म्हणाली, 'मला माझे महत्व माहित आहे...'
- मेल आणि फीमेल आर्टिस्टमध्ये फीसच्या तफावतीबाबत दीपिका म्हणाली, "मला माझा ट्रॅक रेकॉर्ड माहित आहे आणि मला माझे महत्वदेखील माहित आहे. मला माहित आहे की, त्याचे (मेल अॅक्टर) चित्रपट, माझ्या चित्रपटांच्या तुलनेत चालत नाहीत. याला काहीच अर्थ नव्हता. तेव्हा मला याकारणामुळे (फ्लॉप झाला तरीही अॅक्टरला जास्त फीस, याकारणाने ) त्या चित्रपटाला नाही म्हणणेच योग्य वाटले, कारण ते चुकीचे होते". रिपोर्ट्सनुसार, दीपिका एका फिल्मसाठी सुमारे 12 कोटी रुपये चार्ज करते. 

 

भेदभाव करणाऱ्या चित्रपटांचे ऑफर नाकारत राहील दीपिका... 
- दीपिकाने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये मेल आणि फीमेल आर्टिस्ट्समध्ये भेदभाव होत राहतो आणि ती अशा भेदभाव करणाऱ्या चित्रपटांना नेहमी नाकारत राहील, जेणेकरून रात्री शांत झोप लगेल. दीपिका, "मला नाही वाटत मी या विचारासोबत जगू शकेन की, मी अशा चित्रपटाचा भाग होते. ज्यामध्ये माझे बरोबरीचे क्रिएटिव कॉन्ट्रिब्यूशन होते, फिल्ममध्ये आम्हाला बरोबरीची व्हॅल्यू होती, पण मला कमी फीस दिली गेली". दीपिका सध्या डायरेक्टर मेघना गुलजारची फिल्म 'छपाक' मध्ये काम करत आहे. विक्रांत मैसी या चित्रपटात तिचा को-अॅक्टर असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...