आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : दीपिकाचा जन्म 5 जानेवारी, 1986 ला कोपेनहेगन, डेनमार्कमध्ये झाला. आज तिचा 33 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी ती कोणतेतरी मोठे सरप्राइज देणार आहे ज्याची हिंट तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दिली आहे. दीपिकाने लिहिले - 'काहीतरी मोठे होणार आहे, तुमच्याशी शेयर करण्याची आतुरतेने वाट पहाते आहे'
आगामी चित्रपट असेल छपाक...
दीपिकाची मागील वर्षी केवळ एक फिल्म पद्मावत रिलीज झाली होती जी बॉक्सऑफिसवर हिट झाली. त्यानंतर मात्र दीपिका कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. मात्र, 14-15 नोव्हेंबरला रणवीर सिंहसोबत लग्न केल्यामुळे ती खूप चर्चेत राहिली. आता ती लवकरच कामावर परतणार आहे. तिचा आगामी चित्रपट 'छपाक' असेल ज्याला मेघना गुलजार बनावट आहे. 'छपाक'ची शूटिंग फेब्रुवारीमध्ये न होता आता मार्चमध्ये सुरु होणार आहे. शूटिंगसाठी नवरात्री आणि होळीदरम्यान एखादा शुभ मुहूर्त शोधला जात आहे. यामध्ये अभिनेता विक्रांत मस्सी याला, दीपिकाच्या अपोजिट कास्ट केले गेले आहे.
'छपाक' पासून प्रोड्यूसरही बनली दीपिका...
या फिल्मपासून दीपिका प्रोडक्शनमध्ये उतरत आहे. तिने या चित्रपटावर 12 कोटी रुपये इन्वेस्ट केले आहे. बाकीची रक्कम फॉक्स स्टार इंडियावाले लावणार आहेत. मार्केटिंग आणि मॅन पॉवर याच कंपनीचे असेल.
अॅसिड सर्व्हाइव्हर लक्ष्मीची कहाणी आहे 'छपाक'...
2005 मध्ये एका व्यक्तीने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला केला होता. ज्यामुळे तिचा पूर्ण चेहरा जाळला होता. लक्ष्मी 10 वीपर्यंतच शिकू शकली. पण तिला ब्यूटी पार्लरचे काम येते. पण जळालेल्या चेहऱ्यामुळे कुठेही काम मिळत नाही. फिल्ममध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.