आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. दीपिका पदुकोण सध्या पती रणवीर सिंहसोबत हनिमून एन्जॉय करत आहे. तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत दीपिका आपल्या अफेअरविषयी बोलतेय. फिल्मफेअर मॅग्जीनला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने खुलासा केला होता की, वयाच्या 13 वर्षी रिलेशनशिपमध्ये होती. रणवीर हे दीपिकाचे पहिले प्रेम नाही. एका मॅग्जीनला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, 13 वर्षांची असतानापासून रिलेशनशिपमध्ये आहे. या वयात असताना तिचे पहिले अफेअर झाले होते आणि तेव्हापासून ती कुणा न कुणासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली आहे.
वारंवार मिळालेल्या विश्वासघातामुळे कोलमडली होती दीपिका, तिला हवी नव्हती कमिटमेंट
- दीपिका सांगते, "मी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले आहे आणि अनेक वेळा माझा विश्वासघात झाला. मी रणवीरला भेटले तेव्हा खुप वाईटप्रकारे त्रस्त झालेले होते. कारण मी सतत रिलेशनशिपमध्ये होते. मला काही काळ एकटे राहायचे होते. तोपर्यंत मी कुणालाही कॅज्यूअली डेट केले नव्हते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी मी रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हापासून मी फक्त एक वर्ष, 2 किंवा 3 वर्ष राहिली असेल, पण नेहमी प्रामाणिकपणे मी नात्यात राहिले. मी नेहमी माझे 100% दिले."
- "जेव्हा माझे 2012 मध्ये एक नाते मोडले तेव्हा मी पुर्ण पणे कोलमडले होते. आता मला फक्त कॅज्यूअली डेटिंग फॉलो करायची होती. कारण मला कुणालाही उत्तर द्यायचे नव्हते. मी आणि रणवीर 2012 मध्ये भेटलो. तेव्हाच त्याच्यासोबत एक खास कनेक्शन वाटले आणि हे मी त्याला सांगितले होते."
- रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच मी म्हणाले होते की, मला ओपन राहायचे आहे मला कोणतीही कमिटमेंट करायची नाही. जर मी कुणाकडे अॅक्ट्रॅक्ट झाले तर काय करायचे हा माझा निर्णय असेल. त्यावेळी असे काहीच झाले नाही. मी स्वतःला दूसरीकडे कुठे घेऊन जाऊ शकले नाही आणि आता मी विवाहित आहे."
अमेरिकेत मिळतो दीपिकाच्या नावाचा डोसा
- 2019 च्या सुरुवातीला दीपिका पदुकोणने एक वृत्त चाहत्यांसोबत स्वतः सोशल मीडियावर शेअर केले.
- दीपिकाने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये सांगितले की, तिच्या नावाने अमेरिकेच्या एका रेस्तरॉमध्ये डोसा मिळतोय. या डोस्याची किंमत 10 डॉलर म्हणजे 700 रुपये आहे.
- तसे देशातही दीपिकाच्या नावाचा मेन्यू तयार केला जात आहे. इंस्टाग्रामवर एका चाहत्याने तिला टॅग करत लिहिले की, पुण्यामध्ये तिच्या नावाची पराठा थाली मिळतेय. चाहत्याच्या या पोस्टवर दीपिकाने खुप हसण्याच्या स्माइली पोस्ट केल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.