आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा पुष्कर हत्याकांडवर तयार होणार चित्रपट, दीपिका पदुकोण साकारु शकते भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. बॉलिवूडमध्ये चित्रपटांवर सध्या नवनवीन प्रयोग केले जात आहेत. बायोपिक आणि हिस्टॉरिकल चित्रपटांसोबतच थ्रिलर जॉनरही सध्या प्रेक्षकांना खुप आवडत आहे. अंधाधुनला चांगले यश मिळाले आहे. साहोसुध्दा असाच जॉनर चित्रपट आहे. यासोबतच जॉन अब्राहम स्टारर बाटला हाउसची शूटिंगही सुरु झाली आहे. 


शिवम नायर करणार डायरेक्ट
या सर्व चित्रपटांसोबतच इंडस्ट्रीमध्ये अजून एक थ्रिलर प्लानिंग केली जात आहे. या चित्रपट सुनंदा पुष्कर हत्याकांडवर आधारित असणार आहे. अंधाधुनचे डायरेक्टर श्रीराम राघवन यांना असिस्ट केलेले शिवम नायर हा चित्रपट बनवत आहेत. शिवम यांनी यापुर्वी आहिस्ता आहिस्ता, भाग जॉनी आणि नीरज पांडेच्या बॅनरचा चित्रपट नाम शबाना डायरेक्ट केला आहे. यासोबतच त्यांनी रंगा बिल्ला, ऑडो शंकर आणि फिरोज दारुवाला सारख्या सीरियल किलर्स आणि मर्डरर्सवर आधारित डॉक्यूमेंट्री चित्रपट बनवले आहेत. 


7 जानेवारी 2014 मध्ये झाला होता सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू 
सुनंदा पुष्कर हत्यांकाडवर आधारित या चित्रपटाचे प्रोड्यूसर अमित सिंह आहेत. चित्रपटासाठी रिसर्च पुर्ण झाले आहे. नीरज पांडेसोबत मिळून या चित्रपटाचे प्रोडक्शन केले जाणार अशा चर्चा आहेत. अमितने यापुर्वी केत मारुसोबत मिळून दर्शन कुमार स्टारर मिर्जा ज्यूलियट चित्रपट बनवला होता. बिझनेस वुमन आणि पॉलिटीशियन शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू 7 जानेवारी 2014 मध्ये झाला होता. दिल्ली येथील लीला पॅलेस हॉटेलच्या रुम नंबर 345 मध्ये त्यांना मृत्यू झाला होता. 

 

एप्रिलमध्ये कोर्टाने घेतली दखल 
सुरुवातीला सुनंदा यांनी आत्महत्या केली असे बोलले जात होते. नंतर त्यांच्या शरीरावर जखमा दिसल्या. यानंतर त्यांचा मर्डर झाला अशा चर्चा झाल्या. या प्रकरणी एक मोठी कंट्रोवर्सी झाली. 1 जुलै 2014 रोजी एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दावा केला की, या प्रकरणाचा खोटा रिपोर्ट दाखवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या एसआटीने सव्वा चार वर्षांनंतर चार्जशीट दाखल केला होता. अखेर यावर्षी एप्रिलमध्ये दिल्लीच्या कोर्टाने पोलिसांच्या चार्जशीटची दखल घेतली.


लवकरच दीपिकाला करणार अप्रोच 
थरुर याप्रकरणी अबेटमेंट टू सुसाइडनुसार आयपीसी ट्रायलचा सामना करत आहेत. त्यांच्यावर पुरावे मिटवण्याचे आरोप आहेत. चित्रपटाच्या सुत्रांनी सांगितले की, सुनंदाने आपल्या मृत्यूमागे अनेक प्रश्न सोडले आहेत. त्याच्या कड्या जोडत चित्रपटाची प्लानिंग करण्यात आली आहे. मेकर्स सुनंदाच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला अप्रोच करणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...