आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Opted Different Style For Film Chhapaak Promotions, Lipstick Marks Left On Paper Napkins

दीपिकाची चित्रपट प्रमोशनसाठी हटके स्टाइल, पेपर नॅपकिन्सवर सोडले लिपस्टिकचे ठसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिने प्रमोशनसाठी एक वेगळी स्टाइल अवलंबली आहे. 'डान्स प्लस 5' या रिअॅलिटी शोमध्ये दीपिकाने अलीकडेच उपस्थिती लावली होती. तत्पूर्वी तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली होती. ज्याला तिने 'छपाक प्रमोशन्स' असे कॅप्शन दिले.  

लिपस्टिक आणि नेल मार्कः या छायाचित्रांमध्ये दीपिकाने पेपर रुमालावर लिपस्टिकने ओठांचे ठसे सोडले आहेत, तर दुसर्‍या चित्रात तिच्या हातावर लिपस्टिकने नख काढल्याचे दिसत आहे. आणखी एका फोटोमध्ये रेड ड्रेसमध्ये ती स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.

जानेवारीमध्ये रिलीज होत आहे चित्रपट अ‍ॅसिड अटॅकमधून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय विक्रांत मैसीदेखील दिसणार आहेत. दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.