आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : दीपिका पादुकोणने रणवीर सिंह आणि विक्की कौशलसोबत खूप विचित्र डान्स केला आहे. त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहे. झाले असे की, वरुण धवनने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये दीपवीर आणि फिल्म उरीचा अभिनेता विकी कौशल 'कलंक' चे गाणे 'घर मोरे परदेसिया' आणि 'फर्स्ट क्लास' वर डान्स करत आहेत.
विकी कौशलने केला नागिन डान्स तर मजा घेऊ लागले लोक...
'कलंक' चे गाणे 'घर मोरे परदेसिया' वर दीपिका, रणवीर आणि विक्की कौशल यांनी इतक्या विचित्र पद्धतीने कथक केले की, सर्वांनाच हसू अनावर झाले. मात्र रणवीर तर आधीपासूनच आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे, पण यावेळी दीपिका आणि विकी हेदेखील वेगळे दिसत होते. काही वेळ कथक केल्यानंतर विकी काैशलने नागिन डान्स केला, जे पाहून दीपिका जोरजोरात हसू लागली. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून एक जण तर म्हणाला सुद्धा की, 'या गाण्यावर नागिन डान्स कोण करतो भाऊ'
वरुण धवन म्हणाला, 'तुम्ही सर्व खरंच फर्स्ट क्लास आहात...'
वरुण धवनने दीपवीर आणि विक्की कौशल यांचा डान्स व्हिडीओ शेयर करून त्याला कॅप्शन दिले, "तुम्ही सर्व खरंच 'फर्स्ट क्लास' आहात. मला खूप छान वाटते, जेव्हा लोक रात्री माझ्या गाण्यांवर डान्स करतात. म्हणजे दिवस डान्स करणेही मजेदार आहे पण रात्री डान्स करण्याची मज्जाच वेगळी आहे." आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त स्टारर फिल्म 'कलंक' 17 एप्रिलला रिलीज होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.