आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CONFIRM: दीपिका पदुकोण-रणवीर सिंहच्या लग्नाची तारीख ठरली, हा आहे मुहूर्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाची तारीख अखेर ठरली आहे. ब-याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तारखेविषयी अंदाज बांधले जात होते. अखेर मुहूर्त निघाला आहे. 20 नोव्हेंबरला हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेता कबीर बेदी यांनी आपल्या ट्विटरवरुन दीपिका-रणवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले - "खुप सुंदर जोडी आणि इटलीमध्ये खुप सुंदर लोकेशन. शानदार इव्हेंट असणार आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला खुप खुप शुभेच्छा. त्यांना आयुष्यभर आनंद मिळो."


इटलीमध्ये होणार लग्न 
- या वर्षाच्या सुरुवातीस या दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या पसरल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. तेव्हापासून दोघांच्या लग्नाच्या तारखेविषयी अंदाज बांधले जात होते. 
- दीपिका आणि रणवीरचा साखरपुडा श्रीलंकेत झाला होता. त्यावेळी दोघं सुट्यांमध्ये गेले होते. तेव्हाच त्यांच्या लग्नाची तारीख फिक्स झाली होती. रिपोर्टनुसार दीपिका आणि रणवीरचे लग्न इटलीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

 

लग्नात 30 पाहूणे होणार सहभागी 
वृत्तांनुसार दीपिका आणि रणवीरसाठी हे वेळ खुप खास आहे. यामुळे त्यांच्या लग्नात काही विशेष मित्र आणि कुटूंबिय उपस्थित राहतील. गेस्ट लिस्टमध्ये फक्त 30 लोकांचा समावेश असेल. इटलीच्या लेक कोमोमध्ये त्यांचे लग्न होईल. रणवीर आणि दीपिकाचे हे पसंतीचे ठिकाण आहे. लग्नानंतर रणवीर दीपिका रिसेप्शन देतील. एक रिसेप्शन मुंबईत होईल. तर दूसरे रिसेप्शन दीपिकाचे मुळं गाव बेंगलुरुमध्ये होईल. 
- याविषयी अजून दीपिका आणि रणवीर यांच्या कुटूंबाने अधिकृत घोषणा केलेली नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...