आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Deepveer First Meeting : पेरेंट्स आणि बहिणीपेक्षाही जास्त दीपिकाला घाबरतो रणवीर, अभिनेत्रीने स्वतः केला होता खुलासा, सांगितले होते - कुठे झाली होती पहिली भेट आणि कशी सुरु झाली लव्ह स्टोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण 33 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी 1986 ला कोपेनहेगेन, डेनमार्क येथे दीपिकाचा जन्म झाला होता. आता ती रणवीर सिंहची पत्नी आहे. 6 वर्ष डेटिंग केल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी लग्न केले. पण तुम्हाला माहिती आहे का की, या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली. एका इंटरव्यूदरम्यान स्वतः दीपिका पदुकोणने याबाबतीत खुलासा केला होता.  

 

दीपिकाला सर्वात जास्त घाबरतो रणवीर ... 
दीपिकाने लग्नाअगोदर एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, रणवीर जर सर्वात जास्त कुणाला घाबरत असेल तर ते म्हणजे स्वतः दीपिका. तो त्याचे पेरेंट्स आणि बहिणीलाही इतके घाबरत नाही. दीपिका म्हणते, "जर रणवीरच्या घरच्यांना त्याच्याकडून एखादे काम करून हवे असेल तर ते मला त्याला मनवायला सांगतील". 

 

दुसऱ्या कुणाचा बॉयफ्रेंड होता रणवीर करत होता दीपिकाला फ़्लर्ट... 
दीपिकाच्या सांगण्यानुसार, रणवीर आणि तिची पहिली भेट सिंगापुरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान झाली होती. पण ते जवळ यानंतर आले होते. दीपिका म्हणते, सिंगापुरमध्ये अवॉर्ड फंक्शनमध्ये भेट झाल्यानंतर मी एक दिवस यशराज स्टूडियोमध्ये शूटिंग करत होते. तेव्हा रणवीरही तिथे आला. त्यावेळी तो दुसऱ्या कुणालातरी डेट करत होता. पण स्टूडियोमध्ये माझ्याशी फ्लर्ट करू लागला. मी हे नोटिस केले आणि म्हणाले - रणवीर तू माझ्यासोबत फ्लर्ट करत आहेस का ? त्यावर तो म्हणाला - नाही. मग मी अजून एकदा विचारले, तू माझ्यासोबत फ्लर्ट करत आहेस ?"

 

संजय लीला भन्साळीच्या पार्टीत पहिल्यांदा स्पेशल वाटला रणवीर... 
दीपिकाने इंटरव्यूमध्ये पुढे सांगितले, "फिल्म 'गोलियों की रासलीला: रामलीला' दरम्यान आमची जी भेट झाली, ती स्पेशल बनली. फिल्मचे डायरेक्टर संजय लीला भन्साळीने आम्हाला लंचसाठी इनवाइट केले होते. जेव्हा आम्ही जेवत होतो, तेव्हा माझ्या दातात काहीतरी अडकले होते. यावर रणवीरने गंमतीत म्हणले - 'दीपिका तुझ्या दातात खेकडा अडकला आहे'. उत्तरादाखल मी म्हणले - 'काढून दे'. ही पहिली वेळ होती जेव्हा रणवीर मला स्पेशल वाटलं होता" दीपिका आणि रणवीरचे अफेयर 'गोलियों की रासलीला: रामलीला' च्या सेटवरूनच पुढे वाढत गेले होते.