आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Ranveer Singh More Photo After Marriage Couple Are Happy With Friends

समोर आला 'दीपवीर'चा एक नवीन फोटो, नववधूच्या गळ्यात दिसले मंगळसूत्र, सोशल मीडिया यूजर्सने केली ही डिमांड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आता पती-पत्नी बनले आहेत. लग्नानंतर हळुहळू त्यांचे फोटोज समोर येत आहेत. आतापर्यंत 4 फोटोज समोर आले होते. आता अजून एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दीपवीर आपल्या फ्रेंड्ससोबत एकदम आनंदी दिसत आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये रणवीर ग्रीन कलरच्या पजामा कुर्तामध्ये दिसतोय. त्याने पजामा-कुर्तासोबत व्हाइट कलरचे स्नीकर्स घातले आहेत. तर दीपिका ब्राउन-गोल्डन प्रिंटेड सूटमध्ये दिसतेय. तिने गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. तिच्या भांगेत सिंदूर दिसले नाही. 


सोशल मीडियावर यूजर्सने दीपिकासमोर केली ही डिमांड 
- सोशल मीडियावर या दोघांचे फोटोज पाहून यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने दीपिकाला मागणी केली की, त्याला तिच्या भांगेत सिंदूर पाहायचे आहे. एकाने विचारले 'सिंदूर कुठे आहे?' एका यूजरने रणवीरवर कमेंट करत लिहिले - 'अलाउद्दीन खिल्चीने मॅच जिंकली.' तर एकाने लिहिले - 'याने आत तिचे कपडे घातले असे दिसतेय.'

 

खरेदी केला 50 कोटींचा बंगला 
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, दीपिका आणि रणवीरने मुंबईच्या जुहूमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या दोघांचे बजेट 70 कोटींचे होते, पण त्यांना जवळपास 50 कोटींमध्ये बंगला मिळाला आहे. दोघही या बंगल्यात खुप पर्सनलाइज्ड इंटीरियर करत आहेत. सध्या काम सुरु आहे. मुंबईमधून परतल्यानंतर ते त्यांच्या सध्याच्या घरात राहतील. 


- रणवीर आणि दीपिकाजवळ तीन घर आहेत. प्रभादेवी, मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे, याची किंमत 15 कोटी रुपये आहे. गोव्यामध्ये एक बंगला आहे. याची किंमत 9 कोटी आहे. यासोबतच गोरेगांव, मुंबईमध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे, याची किंमत 10 कोटी रुपये आहे.


- दीपिकाजवळ बांद्रा, मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे. याची किंमत 7 कोटी आहे. हा फ्लॅट तिने किरायाने दिला आहे. याचे प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये येतात. यासोबतच प्रभादेवी परिसरात तिचा एक फ्लॅट आहे. याची किंमत 40 कोटी आहे. हा फ्लॅट 26 व्या मजल्यावर आहे. 

 

दीपिकाने लग्नात घातला 9 लाखांचा लहेंगा 
दीपवीरने कोंकणी आणि सिंधी दोन पध्दतींनी लग्न केले. कोंकणी लग्नामध्ये दीपिकाने रेड कलरची साडी नेसली होती. तर सिंधी लग्नामध्ये दीपिकाने रेड-गोल्डन लहेंगा घातला होता. रिपोर्ट्सनुसार डिझायनर सब्यसाचीने हा लहेंगा 9 लाखांमध्ये डिझाइन करुन दिला. लहेंग्यासोबत लाल रंगाची चुनरी होती, त्यावर सोन्याच्या तारांचे वर्क होते. यावर संस्कृतमध्ये सदा सौभाग्यवती भव: असे लिहिलेले होते.

बातम्या आणखी आहेत...